ETV Bharat / sitara

राणा दग्गुबातीच्या 'हाथी मेरे साथी'चा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला - 'हाथी मेरे साथी' २६ मार्च २०२१ रोजी प्रदर्शित

'हाथी मेरे साथी' या साहसी चित्रपटाचा बहुप्रतिक्षित हिंदी ट्रेलर आज प्रदर्शित झाला. इरॉस इंटरनॅशनलने आपल्या व्हर्च्युअल कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा ट्रेलर प्रेक्षकांसाठी जाहिर केला. राणा दग्गुबाती, प्रभु सोलोमन, विष्णू विशाल, श्रीया पिळगावकर यांच्या उपस्थितीत चेन्नई आणि हैदराबाद येथे या चित्रपटाचा हिंदी आवृत्ती ट्रेलर आभासी पत्रकार परिषदेत जाहीर केला आहे.

'Hathi Mere Saathi'
'हाथी मेरे साथी'चा दमदार ट्रेलर
author img

By

Published : Mar 4, 2021, 7:31 PM IST

मुंबई - इरॉस इंटरनॅशनलने आपल्या व्हर्च्युअल कॉन्फरन्सच्या माध्यमातून 'हाथी मेरे साथी' या साहसी चित्रपटाचा बहुप्रतिक्षित हिंदी ट्रेलर आज जाहीर केला आहे. आदल्या दिवशी 3 मार्च रोजी जागतिक वन्यजीव दिनानिमित्त निर्मात्यांनी राणा दग्गुबाती, प्रभु सोलोमन, विष्णू विशाल, श्रीया पिळगावकर यांच्या उपस्थितीत चेन्नई आणि हैदराबाद येथे तीन भाषेतील चित्रपटाचा बहुप्रतिक्षित तामिळ आणि तेलुगू ट्रेलर रिलीज केला होता आणि आता या टीमने 'हाथी साथ साथी' या चित्रपटाचा हिंदी आवृत्ती ट्रेलर आभासी पत्रकार परिषदेत जाहीर केला आहे.

'हाथी मेरे साथी'चा दमदार ट्रेलर

'हाथी साथ साथी'च्या ट्रेलरने आपल्या स्केल आणि कामगिरीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. ट्रेलरने चित्रपटाची एक छोटीशी झलक शेअर केली आहे, जी २६ मार्च रोजी रिलीज होणार आहे.

पूर्णपणे वेगळ्या अवतारात तिन्ही आवृत्त्यांमध्ये राणा मुख्य पात्र साकारत आहे. 'हाथी मेरे साथ' या हिंदी आवृत्तीमध्ये तो पुलकित सम्राटसोबत मुख्य भूमिका साकारत आहे आणि विष्णू विशाल कदन (तमिळ) आणि अरण्या (तेलुगू) मध्ये दिसणार आहेत. या चित्रपटात प्रतिभाशाली अभिनेत्री श्रीया पिळगावकर आणि झोया हुसेन यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

हा पॅन-इंडिया बहुभाषिक चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये २६ मार्च २०२१ रोजी प्रदर्शित होईल.

हेही वाचा - नेहमीच मोदी सरकारविरोधात भूमिका घेत आलेत अनुराग आणि तापसी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.