ETV Bharat / sitara

कोरोना मुक्त लव्हबर्ड्स रणबीर आणि आलिया मालदिवला रवाना - कोरोना मुक्त लव्हबर्ड्स

कोरोनाच्या तावडीतून सुखरुप सुटल्यानंतर आलिया भट्ट आणि रणबीर कपूर मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहेत. मालदिव हे बॉलिवूडकरांचे सध्याच्या काळात सर्वात आवडते ठिकाण बनले आहे. हे जोडपे सोमवारी रवाना झाले.

Ranbir Kapoor, Alia Bhatt
रणबीर आणि आलिया
author img

By

Published : Apr 19, 2021, 9:33 PM IST

मुंबई - मालदीवला जाणाऱ्या विमानामध्ये मोठे आकर्षण होते ते बॉलिवूडचे सर्वात मोठे सेलिब्रिटी लव्हबर्ड्स रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे. सोमवारी सुट्टीवर जाण्यापूर्वी ते विमानतळावर हौशी फोटोग्राफर्सच्या कॅमेऱ्यात कैद झाले.

गेल्या आठवड्याभरात कोविड -१९ शी झुंज देत आलियाची १४ एप्रिल रोजी टेस्ट निगेटिव्ह आली. रणबीरलाही गेल्या महिन्याच्या शेवटी कोरोनाची बाधा झाली होती. तो आता या आजारातून पूर्ण बरा झाला आहे. दोघेही कोरोना मुक्त झाल्यानंतर सुट्टीसाठी रवाना झाले आहेत.

सोमवारी सकाळी हे जोडपे मुंबई विमानतळावर लॉकडाऊन दरम्यान मालदीवला जात असताना दिसून आले. कोरोना व्हायरस साथीची दुरी लाट देशात आली असताना अनेक सेलेब्रिटी मालदिवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहेत.

आलिया आजारी पडली तेव्हा संजय लीला भन्साळीच्या गंगूबाई काठियावाडीच्या शूटिंगमध्ये व्यग्र होती. गंगूबाई काठियावाडीशिवाय आलियाच्या हाती अयान मुखर्जी यांचा ब्रह्मास्त्र, बाहुबलीचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली याता आरआरआर आणि करण जोहरचा मल्टीस्टारर तख्त सारखे चित्रपट आहेत.

दरम्यान, रणबीर कपूरच्या हाती ब्रह्मास्त्र आणि करण मल्होत्रा दिग्दर्शित शमशेरा हा चित्रपट आहे.

हेही वाचा - ईटीव्ही विशेष - सिंधुदुर्गातील दशावतार कलाकारांची लॉकडाउनमुळे स्वतःच्या पोटाशीच लढाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.