मुंबई- अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना पोलिसांनी पॉर्न फिल्म शूटिंग करण्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली. मुंबई अशाप्रकारे पॉर्न फिल्म शूटिंग होत असल्याच्या बातमीनंतर संपूर्ण बॉलीवूडसह राज्यभरात खळबळ माजली आहे. मात्र पॉर्न फिल्मची शूटिंग ही राज्यात तात्कालीन देवेंद्र फडणीस सरकार आल्यापासून सुरू होतं, असा धक्कादायक आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. मुलींना आपल्या जाळ्यात अडकवून पॉर्न फिल्म शूटिंग केली जात होते. मात्र राज्यात उद्धव ठाकरे सरकार आल्यानंतर पॉर्न फिल्म शूटिंगच्या मागावर ठाकरे सरकार होतं. या बाबतीत सरकारला यश आले असून राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली असे नाना पटोले म्हणाले. मुंबईतील निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेते नाना पटोले बोलत होते.
कशी झाली राज कुंद्राला अटक
फेब्रुवारी महिन्यात मढ बीच वर असलेल्या एका बंगल्यात पोर्नोग्राफी फिल्मची शूटिंग सुरू असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी या बंगल्यावर धाड टाकली. या धाडीत जवळपास दहा ते बारा लोकांना अटक करण्यात आली. या सर्वांच्या चौकशी दरम्यान व्यवसायिक राज कुंद्रा यांचं नाव पुढे आलं. त्यानंतर राज कुंद्रा यांना 19 जुलै रोजी पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले. चौकशी झाल्यानंतर राज कुंद्रा यांना पोलिसांनी अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार राज कुंद्रा हे पोर्नोग्राफी प्रकरणाचे मास्टर माईंड होते. तसेच यासाठी राज कुंद्रा यांच्याकडून अर्थपुरवठा केला जात असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले.
हेही वाचा - राज कुंद्राने माझे फोटोज आणि व्हीडिओज बेकायदेशीररित्या वापरले - पूनम पांडे