मुंबई - ‘कभी ईद कभी दिवाली’ हा चित्रपट यंदाच्या ईदला रिलीज होणार होता. या चित्रपटच्या रिजीजची प्रतीक्षा पूजा हेगडे करीत आहे. तिचा हा सलमानसोबतचा पहिलाच बॉलिवूड चित्रपट आहे.
'कभी ईद कभी दिवाली' हा कोविडच्या साथीमुळे पुढे ढकलण्यात आलेला पूजाचा एक चित्रपट आहे. या चित्रपटाविषयी पूजाने एका अग्रगण्य दैनिकाला सांगितले की, "हा एक मजेदार चित्रपट आहे ज्यामुळे लोकांना हसू येईल. आम्ही काही काळापूर्वीच याची सुरूवात करण्याची योजना आखली होती, परंतु या साथीच्या आजारामुळे त्याच्या रिलीज वेळापत्रकांवर परिणाम झाला. एकदा गोष्टी थोडी चांगली झाल्यावर आपण आशा धरायला पाहिजे. शूटिंग सुरू करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. मी सलमान खानबरोबर काम करण्यास अत्यंत उत्सुक आणि उत्साही आहे. त्याच्याबरोबर हा माझा पहिला चित्रपट आहे आणि त्याच्याश सेटवर संवाद साधण्यासाठी मी उत्सुक झाले आहे."
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
प्रभासची मुख्य भूमिका असलेल्या आगामी ‘राधे श्याम’ चित्रपटातही पूजा काम करीत असून या चित्रपटाच्या रिलीजचीही तिला प्रतीक्षा आहे. तेलुगू, तामिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम भाषेत हा चित्रपट यावर्षी 30 जुलै रोजी पडद्यावर रिलीज होणार आहे. राधा कृष्ण कुमार यांनी या पिरीयड ड्रामा सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. यासोबतच पूजाची तमिळ चित्रपटात विजयसोबतही भूमिका आहे.
हेही वाचा - कुणाल कामराने व्हिडिओ पोस्ट करुन उडवली 'कंगना'ची खिल्ली