मुंबई - अभिनेत्री पूजा हेगडे आणि एलनाझ नौरोजी यांचे इन्स्टाग्राम अकाऊंड हॅक झाले होते. आता ते पूर्ववत झाले आहे. पूजाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून हा आपला अनुभव सांगितला आहे.
तिने लिहिले, "माझ्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या सुरक्षिततेवर जोर देऊन शेवटचा तास घालवला. त्वरित मदतीसाठी धाऊन आलेल्या माझ्या तांत्रिक टीमचे आभार मानते. शेवटी, माझे हात माझ्या इंस्टाग्रामला लाभले. #Firstworldproblems #hackersgetalife.
![Pooja Hegde, Elnaaz Norouzi's Instagram profiles hacked](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/100955178_156314479268408_2824605828742000222_n_2805newsroom_1590659356_621.jpg)
पूजाने पुढे म्हटलंय, "तसेच, मागच्या काही तासांत माझ्या अकाऊंटमधील कोणताही मेसेज किंवा पोस्टला धक्का लागलेला नाही. मी आशा करते, की आपण कोणतीही वैयक्तिक माहिती दिली नसेल. धन्यवाद.''
सेक्रेड गेम्सची अभिनेत्री एलनाझ नौरोजीला सुद्धा याच अनुभवातून जावे लागले. नुकतेच तिचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याचे तिने सांगितलंय. आता ते सावरले गेले आहे आणि तिचे उकाऊंट हॅक झाल्यावर कोणतीही छेडछाड झालेली नसल्यामुळे तिने आनंद व्यक्त केलाय.
एलनाझला हे लक्षात आलंय, की जेव्हा अकाऊंड अॅक्सेस होत नाही,तेव्हा तडजोड करावी लागते.
ती म्हणाली, “पासवर्ड बदलला होता आणि त्यानंतर इन्स्टाग्राम मला पासवर्ड बदलू देत नव्हते आणि काही संदेश मिळत होता, की खाते माझे आहे याची खात्री करण्यासाठी मला इन्स्टाग्रामवर संपर्क साधण्याची गरज आहे.”
"सायबर गुन्हेगारी कायमच उच्च पातळीवर आहे. माझे इन्स्टाग्राम हॅक झाले होते. माझ्या मित्रांना संदेश पाठविणार्या किंवा अयोग्य चित्र पोस्ट करणार्या व्यक्तीबद्दल मला फारच काळजी वाटत होती. माझ्या टीमने ते परत मिळविण्यात मदत केली. असे काहीतरी घडले तेव्हा आम्ही आपली प्रतिष्ठा गमावण्यास उभे असतो. एलिनाझ पुढे म्हणाली, ''काहीही अघटीत घडले नाही याचा मला आनंद आहे आणि माझे इन्स्टाग्राम अकाऊंट परत सुरळीत झाले आहे.''
सध्या कोव्हिड-१९ मुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात एलनाझ जर्मनीमध्ये आहे.