ETV Bharat / sitara

Shah Rukh Threate : शाहरुख खानचा मन्नत बंगला उडवण्याची धमकी देणाऱ्याला अटक - Mannat bungalow of ShahRukh Khan

बॉलीवूडचा किंग शाहरुख खान (Actor Shahrukh Khan) याचा मन्नत बंगला उडवून देण्याची धमकी एका व्यक्तीने दिली होती. त्या आरोपीला आता पोलिसांनी अटक केली आहे.

मन्नत बंगला
मन्नत बंगला
author img

By

Published : Jan 11, 2022, 10:50 AM IST

मुंबई : बॉलीवूडच्या किंग शाहरुखच्या (Bollywood King Khan Shahrukh Khan) जीवाला धोका असल्याची बातमी काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. कारण एका अज्ञाताने शाहरुखचा मन्नत बंगला ( Mannat bungalow of ShahRukh Khan ) उडवून देण्याची धमकी दिली होती. या प्रकरणाची दखल घेत धमकी देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. जितेश ठाकूर असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याला मध्यप्रदेश पोलिसांनी जबलपूरमधून ताब्यात घेतलं आहे.

६ जानेवारी २०२२ रोजी जितेशने महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला ( Maharashtra Police Control Room ) फोन करून शाहरुखचा मन्नत बंगला बॉम्बने उडवणार असल्याचे सांगितले होते. यामध्ये त्याने शाहरुखच्या बंगल्यासह मुंबईतील विविध ठिकाणी दहशतवादी हल्ले आणि बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिली होती. त्यानंतर आरोपीचा मुंबई पोलिसांनी कॉल ट्रेस केला ( Mumbai Police traced Jitesh's call ) आणि तो नंबर मध्य प्रदेशातील जबलपूरचा होता. तो काही दिवसापासून शाहरुख खानच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट सुद्धा टाकत होता.

हेही वाचा : अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी खूशखबर, हिंदी भाषेतील 'पुष्पा' झळकणार ओटीटीवर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.