मुंबई - आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे रिअल लाईफ कपल लवकरच पडद्यावरही एकत्र दिसणार आहे. आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात ते स्क्रीन शेअर करणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाविषयीच्या चर्चा सुरू आहेत. अशात चित्रपटातील आलिया आणि रणबीरचा लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
अयान मुखर्जीने सोशल मीडियावर दोघांचा सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत आलिया काहीशी गंभीर दिसत आहे तर रणबीर तिच्याकडे एकटक पाहत आहे. नवीन वर्षाची आणि अनेक नव्या गोष्टींची सुरूवात असे कॅप्शन अयानने या फोटोला दिले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
चित्रपटात आलिया आणि रणबीरशिवाय अमिताभ बच्चनही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अयान मुखर्जी यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली असून ही कथा लिहिण्यासाठी त्यांना तब्बल ५ वर्षे लागले होते. या चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी पहिल्यांदाच एकत्र झळकणार असल्याने त्यांच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट अधिक खास ठरणार आहे.