ETV Bharat / sitara

'द गर्ल ऑन द ट्रेन'साठी परिणीतीनं लूकमध्ये केला हा बदल, फोटो केला शेअर - hollywood remake

सुपरहिट ठरलेला हॉलिवूड चित्रपट 'द गर्ल ऑन द ट्रेन'चा हा हिंदी रिमेक असणार आहे. चित्रपटासाठी सध्या परिणीती तयारीला लागली आहे. नुकतीच ती मुंबईतील एका सलूनमध्ये स्पॉट झाली.

परिणीतीनं लूकमध्ये केला हा बदल
author img

By

Published : Jul 13, 2019, 7:38 PM IST

मुंबई - आपल्या डॅशिंग अंदाजामुळे ओळखली जाणारी अभिनेत्री परिणीती चोप्रा आपल्या आगामी चित्रपटासाठी सज्ज झाली आहे. 'द गर्ल ऑन द ट्रेन'च्या हिंदी रिमेकमधून ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून चित्रपटासाठी सध्या परिणीती तयारीला लागली आहे. नुकतीच ती मुंबईतील एका सलूनमध्ये स्पॉट झाली.

याठिकाणी जाऊन परिणीतीनं आपल्या केसांचा रंग डार्क ब्राउन केला आहे. तिनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सलूनमधील एक फोटो शेअर करत केसांचा रंग बदलत असल्याचे सांगितले आहे. 'द गर्ल ऑन द ट्रेन' होण्याची वेळ झाली आहे, असं तिनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सुपरहिट ठरलेला हॉलिवूड चित्रपट 'द गर्ल ऑन द ट्रेन'चा हा हिंदी रिमेक असणार आहे. रिभू दासगुप्ता या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर रिलायन्स एंटरटेन्मेंट आणि अंबलीन एंटरटेन्मेंट यांची निर्मिती असणार आहे. हा एक रहस्यमय आणि रोमांचकारी चित्रपट असणार आहे. २०२० मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.