ETV Bharat / sitara

परेश रावल यांना कोरोनाची बाधा, काही दिवसापूर्वीच घेतली होती लस - परेश रावल यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह

परेश रावल यांना कोरोनाची बाधा झाली आहे. काही दिवसापूर्वीच त्यांनी कोरोनाची लस घेतलेला फोटो शेअर केला होता. आता त्यांनी सोशल मीडियावरुन कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे कळवले आहे.

Paresh Rawal tests positive for COVID-19
परेश रावल यांना कोरोनाची बाधा
author img

By

Published : Mar 27, 2021, 5:52 PM IST

मुंबई - अभिनेता परेश रावल यांनी काही दिवसापूर्वी कोरोनाची लस घेतली होती. लस घेतानाचा फोटटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. दरम्यान परेश रावल यांनी आपली कोविड १९ चाचणी केली असता ती पॉझिटीव्ह आली आहे.

परेश रावल यांनी ही माहिती आपल्या ट्विटरवर शेअर केली आहे. ते म्हणतात, ''दुर्दैवाने माझी कोविड चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. माझ्या संपर्कात १० दिवसापासून जे आले असतील त्यांनी कृपया चाचणी करुन घ्यावी.''

Paresh Rawal tests positive for COVID-19
परेश रावल यांचे ट्विट

परेश रावल यांनी या महिन्याच्या सुरुवातीलाच कोविडची लस घेतली होती. त्यांनी लस घेतानाचा फोटोही शेअर केला होता. लस घेतल्यानंतर त्यांनी नर्स, डॉक्टर्स आणि इतरांचे आभारही मानले होते.

अलिकडेच कार्तिक आर्यन, रणबीर कपूर आणि रोहित सराफ यांच्याही कोविड चाचण्या पॉझिटीव्ह आल्या होत्या. ते आता क्वारंटाईन असून उपचार घेत आहेत.

बॉलिवूडच्या अनेक आघाडीच्या कलाकारांना यापूर्वीही या प्राणघातक कोरोना विषाणूची बाधा झाली होती. यामध्ये रणबीर कपूर, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, कृती सेनॉन, तारा सुतारिया, सिद्धांत चतुर्वेदी या कालाकारांचा समावेश आहे.

हेही वाचा - 'रँचो'नंतर 'व्हायरस'ने 'फरहानला'ही गाठले, आर माधवन 'थ्री इडियट्स'चा संदर्भ देत खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.