ETV Bharat / sitara

'हंगामा -2' च्या शूटिंगसाठी परेश रावल आणि शिल्पा शेट्टी मनालीत दाखल

2003 साली रिलीज झालेल्या 'हंगामा' या विनोदी चित्रपटाचा सिक्वेल 'हंगामा -2' पुन्हा पडद्यावर पाहायला मिळणार आहे. याचे शूटिंग मनालीमध्ये सुरू होत आहे. यासाठी अभिनेता परेश रावल हे शिल्पा शेट्टीसह मनालीमध्ये पोहोचले आहेत.

Paresh Rawal
'हंगामा -2' च्या शुटिंगसाठी परेश रावल
author img

By

Published : Oct 5, 2020, 1:40 PM IST

कुल्लू - 'हंगामा' या २००३ मध्ये हिट ठरलेल्या चित्रपटाचा सिक्वेल 'हंगामा -२' बनत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी निर्माता प्रियदर्शन यांच्यासह परेश रावल, शिल्पा शेट्टी आणि मिझान मनालीमध्ये दाखल झाले आहेत.

कोरोना संकटानंतर 'हंगामा 2' चित्रपटाच्या युनिटने पहिल्यांदाच मनाली गाठली आहे. कॉमेडियन परेश रावल 'हंगामा -२' च्या शूटिंगसाठी प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीसह रविवारी मनालीला दाखल झाले. त्यांच्यासोबत मिझान जाफरी आणि परिणीता सुभाषसुद्धा शूटिंगसाठी आले आहेत. बिग बजेट चित्रपटाच्या या शूटिंसाठी सर्व स्टार्स खासगी विमानातून भुंतर विमानतळावर उतरले. यानंतर ते थेट कारने हॉटेलवर पोहोचले.

Shetty arrive in Manali
परेश रावल शिल्पा शेट्टीसह मनालीमध्ये पोहोचले

चित्रपटाची टीम प्रसिद्ध बागवान नकुल खुल्लरच्या बडागढ रिसॉर्टमध्ये राहण्यासाठी उतरली आहे. चित्रपटाचे शूटिंग नग्गर, मनाली आणि सोलंगनाला येथे पार पडणार असल्याचे सिनेमाचे समन्वयक अनिल कायस्थ यांनी सांगितले. एप्रिल आणि मे महिन्यात हे शूटिंग मनालीमध्ये होणार होते. परंतु कोरोनाच्या संकटामुळे हे शुटिंग पुढे ढकलण्यात आले होते.

पुढील बरेच दिवस शिल्पा शेट्टी यांच्यासह संपूर्ण युनिट मनाली येथे तळ ठोकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या मनालीतील पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. येथे शूटिंग पुन्हा सुरू होत असल्यामुळे पर्यटनालाही पुन्हा सुरूवात होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.