मुंबई - ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना शनिवारी प्रतिष्ठेचा समजला जाणारा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. हा बहुमान त्यांना मिळाल्याचा विशेष आनंद मला वाटत असल्याचे मत त्यांची पत्नी पद्मा वाडकर यांनी 'ईटीव्ही भारत'सोबत एक्सक्लुसिव्ह बोलताना मांडले.
हेही वाचा - मला 'पद्मश्री' देऊन केंद्र सरकारने लतादीदींची इच्छा केली पूर्ण - सुरेश वाडकर
सुरेशजींना पद्म पुरस्कार मिळावा यासाठी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी तब्बल 20 वर्षे केंद्र सरकारसोबत पत्रव्यवहार केला होता. मात्र, अखेर आज केंद्र सरकारने दिदींच्या म्हणण्याला मान देऊन हा पुरस्कार सुरशजींना दिल्याने या पुरस्काराचा योग्य सन्मान झाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
इतके दिवस सुरेशजी गमतीने मला पाहून, मला 20 वर्षांपूर्वीच पद्म पुरस्कार मिळाला असल्याचे म्हणायचे. मात्र, आज त्यांच्या आयुष्यात पद्मासोबत पद्मश्री आल्याचा मला विशेष आनंद होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा - 'तान्हाजी' चित्रपटात 'चुलत्या'ची भूमिका साकारणाऱ्या कैलास यांचा भोकरदनमध्ये सत्कार