ETV Bharat / sitara

शत्रुघ्न सिन्हांचा कंगनाला पाठिंबा, टीका करणाऱ्यांना म्हणाले.. - बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री

कंगनाने बॉलिवूडमध्ये अनेक दिग्गज निर्मात्यांवर नेपोटिझ्मचा उघड आरोप केला आहे. कंगनाच्या या मताशी काहीजण सहमत होत आहेत, तर काहीजण विरोधही करीत आहेत. अशात शत्रुघ्न सिन्हा आता तिच्या पाठिशी उभे राहाताना दिसत आहे. इंडस्ट्रीतील काही लोक कंगनावर राग धरुन असल्याचे त्यांनी म्हटलंय.

Shatrughan Sinha
शत्रुघ्न सिन्हा
author img

By

Published : Jul 25, 2020, 2:58 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये इनसायडर विरुध्द आऊटसायडर असा वाद सुरू झाला आहे. याबाबतीत कंगना रनौत खूप आक्रमक आहे. आतापर्यंत तिने बिनधास्तपणे आपली मते मांडली आहेत.

कंगनाने बॉलिवूडमध्ये अनेक दिग्गज निर्मात्यांवर नेपोटिझ्मचा उघड आरोप केला आहे. तिच्या म्हणण्यानुसार बॉलिवूडमध्ये एक मुव्ही माफिया गँग आहे जी आऊटसायडर्सचे करियर खराब करुन टाकते. कंगनाच्या या मताशी काहीजण सहमत होत आहेत, तर काहीजण विरोधही करीत आहेत. अशात शत्रुघ्न सिन्हा आता तिच्या पाठिशी उभे राहाताना दिसत आहे.

हेही वाचा -'हॉटस्टार'वर प्रदर्शित झाला 'दिल बेचारा'; सबस्क्रिप्शनशिवायही पाहता येणार..

एका आघाडीच्या पोर्टलशी बोलताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, "मी खूप लोकांना पाहिलंय की जे कंगनाच्या विरोधात बोलताहेत, कारण ते आतून जळताहेत. त्यानं वाटतं की आमच्या उपकाराशिवाय, मर्जी शिवाय, आमच्यात सहभागी झाल्याशिवाय, आमच्या आशिर्वादाशिवाय, आमच्या पाठिंब्याशिवाय ही मुलगी पुढे कशी काय गेली. या गोष्टीचा त्यांना राग आहे, जळजळ आहे. त्यांना कंगनाच्या यशावर राग आहे."

याविषयावर यापूर्वीही शत्रुघ्न सिन्हा यांनी मत व्यक्त केले होते. त्यांनी कॉफी विथ करण शोवर आपला निशाणा साधला होता. फिल्म इंडस्ट्री कोणाची प्रॉपर्टी नसल्याचेही ते म्हणाले होते. इंडस्ट्रीमध्ये कोणी राहायचे आणि कोणी नाही हे ठरवण्याचा कोणालाही अधिकार नाही, असेही ते म्हणाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.