मुंबई - बंगाली सिनेमाची प्रसिद्ध अभिनेत्री आणि तृणमूल कॉंग्रेसची खासदार असलेल्या नुसरत जहां गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींमुळे चर्चेत आहे. सध्या ती गर्भवती असून आपल्या बेबी बम्पचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तेव्हापासून नुसरत चर्चेत आहे. अलिकडेच तिने सोशल मीडियावर शेअर केलेली एक व्हिडिओ क्लिप पुन्हा चर्चेत आली आहे. यात ती अंडरवॉटर बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसत आहे. चाहते या व्हिडिओवर बऱ्याच कॉमेंट करत आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
नुसरत जहांच्या फोटोंनी सोशल मीडियावर वादळ निर्माण केले आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नुसरत जहां नेव्ही ब्लू कलरच्या आउटफिटमध्ये दिसली आहे. तसेच ती स्मोकी मेकअपमध्येही बरीच सुंदर दिसत आहे. नुसरतचा हा ग्लॅमरस अवतार आणि पाण्याखाली दिलेल्या वेगवेगळ्या पोजला चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे.
ही व्हिडिओ क्लिप शेअर करीत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'नो रिस्क नो स्टोरी.' यापूर्वी नुसरतचा एक फोटो व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती आपल्या बेबी बम्पला फ्लॉन्ट करताना दिसली होती. या फोटोच्या कॅप्शनमध्येतिने लिहिले होते, 'दयाळूपणा सर्व गोष्टी बदलतो'. या फोटोलाही चाहत्यांनी पसंती दाखवली होती.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अलिकडेच नुसरत जहांने तिचा नवरा निखिल जैन याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नुसरतने तुर्कीमध्ये निखिलशी लग्न केले होते. सध्या त्यांच्या घटस्फोटांची चर्चा रंगत आहे. दोघांचे लग्न खूप चर्चेचा विषय ठरला होता. त्यांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
हेही वाचा -HBD : सई ताम्हणकर आणि करिष्मा कपूर यांच्या प्रकट दिनानिमित्त.....