मुंबई - बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीने भट्ट कॅम्पमधील भाष्य केले आहे. इम्रान हा चित्रपट निर्माते महेश भट्ट आणि मुकेश भट्ट यांचा पुतण्या आहे. भट्ट बंधूंच्या वेगळे होण्याबद्दल इम्रान म्हणाला, 'सर्व चांगल्या गोष्टींचा अंत होतो.'
१९८७ मध्ये महेश भट्ट आणि मुकेश भट्ट यांनी विशेष फिल्म्सची स्थापना केली होती. ५३ चित्रपटांची निर्मिती करुन या बंधूंनी चाकोरी बाहेरच्या सिनेमांची निर्मिती केली. दोघांच्यातील संघटन आता संपुष्टात आले आहे. परंतु त्यांच्यात नेमके काय घडले हे उघड झालेले नसल्याचे इम्रान हाश्मीने सांगितले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
एका प्रमुख दैनिकांशी बोलताना इम्रानने म्हटले आहे की, “माझ्याकडे विशाल फिल्म्सच्या खूप आठवणी आहेत. मी फक्त अशी इच्छा करतो की आम्ही पुन्हा एकत्र येऊन सिनेमा बनवू. विषय काय असेल हे मला ठाऊक नाही. परंतु तुमच्या प्रश्नाचे उत्तर देताना इतकेच सांगेन की, सर्व चांगल्या गोष्टींचा शेवट होतो. समीकरणे बदलतात. काहीही कायमस्वरूपी नसते. आणि त्यांच्यात काय चालले आहे याचा तपशील जाणून घेतल्याशिवाय मी हे सांगत आहे. जिथेपर्यंत माझा प्रश्न आहे, मी अजूनही त्या दोघांशी बोलतो "मुंबई सागा'च्या आधी मुकेशजींनी मला शुभेच्छा दिल्या. मी महेश भट्ट यांच्या संपर्कात आहे."
महेश-मुकेश यांनी एकत्र काम करण्याचा ब्रेक केल्यामुळे निराश आहे का असे विचारले असता इम्रान म्हणाला, "हो नक्कीच."
कामाच्या पातळीवर इम्रानचे पुढे एक बिझी वर्ष असणार आहे. नुकताच तो मुंबई सागा या चित्रपटात दिसला. त्याचा पुढचा चित्रपट ‘चेहरे’ रिलीज होण्याच्या तयारीत आहे. तथापि, कोविडच्या दुसर्या लाटेमुळे निर्मात्यांना तारखांची अडचण झाली आहे. तो टायगर 3 मध्ये देखील दिसणार आहे.
हेही वाचा - जातीवाचक बोलल्याबद्दल अभिनेत्री मुनमुन दत्ता विरोधात मध्य प्रदेशात गुन्हा दाखल