मुंबई - रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरपर्सन असलेल्या नीता अंबानी सध्या सोशल मीडियावर भरपूर चर्चेत आहेत. त्याचे कारणही खास आहे. त्या वापरत असलेल्या बॅगची किंमत ऐकाल तर तुम्हीही चाट पडाल. या बॅगला २४० हिरे लावण्यात आले आहेत. ज्याची किंमत आहे २ कोटी ६० लाख रुपये.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
नीता अंबानींच्या हातात असलेल्या या बॅगचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो अंबानी परिवाराच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर करण्यात आलाय. या फोटोत नीता अंबानीसोबत करिना कपूर आणि करिश्मा कपूर दिसत आहेत.
एका वेबसाईटच्या म्हणण्यानुसार हर्मिस हिमालय बिर्किन बॅग ही हँडबॅग कलेक्शनमधील सर्वात चांगली बॅग समजली जाते. यात १८ कॅरेट सोन्याच्या हार्डवेअरवर २४० हिरे लावण्यात आलेत. २०१७ मध्ये अशाच प्रकारची पांढरी हिमालय क्रोकोडाइल डायमंड स्टाइल बॅग ३,७९,२६१ डॉलर म्हणजेच २ कोटी ६० लाख रुपयांना विकण्यात आली होती. त्यावेळी दावा करण्यात आला होता की ही सर्वात महाग बॅग आहे.