मुंबई - भारताच्या मिशन मंगळ मोहिमेवर आधारित 'मिशन मंगल' चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वीच सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. भारताच्या मंगळ मोहिमेचे यश दाखवणाऱ्या या ट्रेलरला प्रेक्षकांची उत्तम पसंती मिळाली होती. आता यापाठोपाठ सिनेमाचा दुसरा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला आहे.
यात हे असामान्य स्वप्न साकार करताना येणाऱ्या अडचणी आणि यातून उपाय काढत साध्य केलेल्या यशाची झलक पाहायला मिळते. या मिशनसाठी अनेक अपुऱ्या गोष्टीच हातात असतानादेखील या सर्वातून मार्ग काढत वैज्ञानिकांनी केलेली मेहनत यात दिसते.
-
Fall down 7 times, get up eight! Here’s a story of never giving up! #MissionMangalNewTrailer
— Akshay Kumar (@akshaykumar) August 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Is here!https://t.co/Qsmc3UwaEH@taapsee @SonakshiSinha @vidya_balan @TheSharmanJoshi @menennithya@IamKirtiKulhari @Jaganshakti @foxstarhindi #CapeOfGoodFilms #HopeProductions
">Fall down 7 times, get up eight! Here’s a story of never giving up! #MissionMangalNewTrailer
— Akshay Kumar (@akshaykumar) August 8, 2019
Is here!https://t.co/Qsmc3UwaEH@taapsee @SonakshiSinha @vidya_balan @TheSharmanJoshi @menennithya@IamKirtiKulhari @Jaganshakti @foxstarhindi #CapeOfGoodFilms #HopeProductionsFall down 7 times, get up eight! Here’s a story of never giving up! #MissionMangalNewTrailer
— Akshay Kumar (@akshaykumar) August 8, 2019
Is here!https://t.co/Qsmc3UwaEH@taapsee @SonakshiSinha @vidya_balan @TheSharmanJoshi @menennithya@IamKirtiKulhari @Jaganshakti @foxstarhindi #CapeOfGoodFilms #HopeProductions
मिशन मंगल या चित्रपटातून मंगळयान मोहिमेसाठी महिला आणि भारतीय वैज्ञानिकांनी दिलेलं योगदान अधोरेखित केलं गेलं आहे. या सिनेमात अक्षय कुमार, सोनाक्षी सिन्हा, विद्या बालन, तापसी पन्नू, नित्या मेनन, शरमन जोशी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपट १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.