मुंबई - 'हसी तो फसी' फेम सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्रा लवकरच 'जबरिया जोडी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिहारमधील पकडवा विवाह पद्धतीवर आधारित या चित्रपटात समाजातील एक वास्तवासोबतच प्रेक्षकांना कॉमेडीचा तडकाही अनुभवायला मिळणार आहे.
परिणीती आणि सिद्धार्थचे चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतानाच आता चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. या सिनेमासाठी प्रेक्षकांना आता आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. 'जबरिया जोडी' येत्या २ ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. मात्र, रिलीज डेटमध्ये आता बदल करण्यात आले आहेत.
-
And here comes the new poster of #JabariyaJodi with the new release date: 9 Aug 2019. pic.twitter.com/OwNoLFDFMX
— taran adarsh (@taran_adarsh) July 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">And here comes the new poster of #JabariyaJodi with the new release date: 9 Aug 2019. pic.twitter.com/OwNoLFDFMX
— taran adarsh (@taran_adarsh) July 29, 2019And here comes the new poster of #JabariyaJodi with the new release date: 9 Aug 2019. pic.twitter.com/OwNoLFDFMX
— taran adarsh (@taran_adarsh) July 29, 2019
आता हा सिनेमा ६ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे, म्हणजेच प्रदर्शनाची तारीख आता एक आठवडा पुढे ढकलण्यात आली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी सिनेमाचं नव पोस्टर शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. एकता कपूरची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रशांत सिंग यांनी केलं आहे.