मुंबई - अभिनेत्री क्रिती सेनॉन लवकरच 'अर्जून पटियाला' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात ती पंजाबी अभिनेता दिलजीत दोसांझसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतानाच यातील नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहेत.
या पोस्टरमध्ये क्रिती आणि दिलजीतशिवाय वरूण शर्माचीही झलक पाहायला मिळत आहे. यात दिलजीत आणि वरूण पोलिसाच्या वेशभूषेत दिसत आहेत. तर क्रितीच्या हातात एका न्यूज चॅनेलचा बूम पाहायला मिळत आहे. नवीन पोस्टरसोबतच या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.
गुरूवारी चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा एक कॉमेडी चित्रपट असणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित जुगराज हे असून भूषण कुमार, क्रिशन कुमार आणि दिनेश विजन यांचं दिग्दर्शन आहे. आता या चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात? हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.