मुंबई - स्टूडंट ऑफ द ईअर चित्रपटाला मिळालेल्या तुफान यशानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच 'स्टूडंट ऑफ द ईअर २' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दुसऱ्या भागात टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया या कलाकारांच्या मु्ख्य भूमिका असणार आहेत. चित्रपटाचं आणखी एक नवं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे.
या पोस्टरमध्ये तिन्ही कलाकारांची खास झलक पाहायला मिळत आहे. चित्रपटाचा ट्रेलरही आज दुपारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून दोन नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तारा आणि अनन्याच्या या पदार्पणीय चित्रपटाला आता प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
-
Trailer out today at noon... #StudentOfTheYear2 stars Tiger Shroff, Tara and Ananya... Directed by Punit Malhotra... 10 May 2019 release... #SOTY2 #SOTY2Trailer #BatchOf2019 pic.twitter.com/g20aZaYt7N
— taran adarsh (@taran_adarsh) April 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Trailer out today at noon... #StudentOfTheYear2 stars Tiger Shroff, Tara and Ananya... Directed by Punit Malhotra... 10 May 2019 release... #SOTY2 #SOTY2Trailer #BatchOf2019 pic.twitter.com/g20aZaYt7N
— taran adarsh (@taran_adarsh) April 12, 2019Trailer out today at noon... #StudentOfTheYear2 stars Tiger Shroff, Tara and Ananya... Directed by Punit Malhotra... 10 May 2019 release... #SOTY2 #SOTY2Trailer #BatchOf2019 pic.twitter.com/g20aZaYt7N
— taran adarsh (@taran_adarsh) April 12, 2019
दिग्दर्शक पुनित मल्होत्रा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर हिरू जोहर आणि करण जोहर यांची निर्मिती आहे. मे महिन्यात १० तारखेला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.