ETV Bharat / sitara

५ जूनला चीनमध्ये प्रदर्शित होणार 'काबिल', पाहा नवं पोस्टर - yami gautam

या चित्रपटाच्या निमित्ताने हृतिक आणि यामीने पहिल्यांदाच स्क्रीन शेअर केली. भारतात या चित्रपटाने बॉक्स ऑफिस कलेक्शनसोबतच चित्रपट विश्लेषकांकडूनही कौतुकाची थाप मिळवली.

५ जूनला चीनमध्ये प्रदर्शित होणार 'काबिल'
author img

By

Published : May 31, 2019, 7:44 PM IST

मुंबई - हृतिकच्या २०१७ मध्ये आलेल्या 'काबिल' या ड्रामा थ्रिलर चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. भारतात या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर आता हा चित्रपट चीनमधील प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. ५ जूनला चित्रपट चीनमधील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दरम्यान चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी या सिनेमाचं नवं पोस्टर नुकतंच शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये हृतिक रोशन आणि यामी गौतम शिवाय रोहित रॉय आणि रोनीत रॉय यांचीही झलक पाहायला मिळत आहे.

kaabil
'काबिल'चं नवं पोस्टर

या चित्रपटाच्या निमित्ताने हृतिक आणि यामीने पहिल्यांदाच स्क्रीन शेअर केली. भारतात या चित्रपटाने बॉक्स ऑफिस कलेक्शनसोबतच चित्रपट विश्लेषकांकडूनही कौतुकाची थाप मिळवली. आता हा चित्रपट चीनमधील प्रेक्षकांची मनं जिंकण्यास यशस्वी ठरतो का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Intro:Body:

biz

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.