मुंबई - 'इंडियन आयडॉल' या रियॅलिटी शोमध्ये पार्श्वगायिका नेहा कक्कड एका संगीत वादकाची गोष्ट ऐकून भावूक झाली. यानंतर तिने दोन लाख रुपये मदत म्हणून देण्याची घोषणा केली.
रोशन अली हे संगीत वादक सनी हिंदुस्थानी या स्पर्धकासाठी वादन करीत होते. रोशन अली यांनी दिग्गज गायक नुसरत फतेह अली खान यांच्यासोबत काही काळ काम केले होते. तब्येतीच्या कारणामुळे त्यांना या टीममधून बाहेर पडावे लागले होते. रोशन अलींच्या दुखःद गोष्टीमुळे नेहा कक्कड भावूक झाली. त्यानंतर त्यांना मदत म्हणून तिने दोन लाख रुपये जाहीर केले.
शोमध्ये जज हिमेश रेशमिया यांनी सनीचे कौतुक केले. सर्व रियॅलिटी शोमधील स्पर्धकांसठी सनी आदर्श उदाहरण असल्याचे म्हटले. सनीने कोणतेही गायनाचे प्रशिक्षण घेतलेले नाही. तरीही तो व्यावसायिक गायकासारखे गायन करतो, या गोष्टीला हिमेश रेशमिया आणि विशाल दादलानी यांनी चांगली दाद दिली.