मुंबई - बॉलिवूडची आघाडीची गायिका नेहा कक्कर हिच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. तिच्या गाण्यांची प्रचंड क्रेझ चाहत्यांमध्ये पाहायला मिळते. तिची एक झलक पाहण्यासाठी अनेक चाहते प्रयत्न करत असतात. गुरुवारी १४ फेब्रुवारीला 'व्हॅलेन्टाईन डे' साजरा करण्यात आला. या 'व्हॅलेन्टाईन डे'च्या दिवशी आपल्या लाडक्या सिंगरला शुभेच्छा देण्यासाठी एका चाहत्याने नेहासाठी खास सरप्राईझ देऊन तिची भेट घेतली.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
नेहासाठी या चाहत्याने पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू आणल्या होत्या. 'तू माझ्यासाठी सर्वात सुंदर मुलगी आहेस', असे तो यावेळी तिला म्हणाला. त्याचे अनोखे सरप्राईझ पाहून नेहालाही फार आनंद झाला. तिने त्याच्या भेटवस्तुचा स्विकार करत त्याचे आभार मानले. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेहा सध्या तिच्या आणि हिमांश कोहलीच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. ब्रेकअपनंतर ती स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मीडियावर तिने तिचे ब्रेकअपचे दु:ख व्यक्त केले होते. चाहत्यांनीही तिला या दु:खातून सावरण्याचे सल्ले दिले होते.
अलिकडेच नेहाने तिच्या ब्रेकअपमागचे कारण सांगितले आहे. माध्यमांशी बोलताना ती म्हणाली, की 'सध्या मी माझी सिंगल लाईफ जगत आहे. जेव्हा मी रिलेशनशिपमध्ये होती, तेव्हा माझ्या कुटुंबीयांना, मित्र-मैत्रीणींना वेळ देऊ शकत नव्हती. मी माझा संपूर्ण वेळ फक्त त्या एका व्यक्तीलाच देत होती. तरीही मी त्याला वेळ देत नाही, अशी तो तक्रार करत असे. त्यामुळेच मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला'.