मुंबई - गायकांना त्यांच्या गाण्याचे श्रेय दिले जाते परंतु आजकाल त्यांना पाहायला मिळणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे प्रसिध्द गायिका नेहा कक्कड हिने म्हटले आहे.
''जिथे जिथे गायक असतात तिथे तेव्हा श्रेयाचा मुद्दा येतो, तेव्हा त्यांचा उल्लेख केला जातो.'', असे म्हणत नेहा पुढे म्हणाली, ''गायक दिसले पाहिजेत हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.''
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
गायक जर दिसला नाही तर तो लोकांना परिचित होत नसल्याचे नेहाने सांगितले.
''जेव्हा ते आपल्याला पाहत नाहीत तेव्हा ते आपल्याला ओळखत नाहीत. तर, गायकांना पाहणे खूप महत्वाचे झाले आहे. म्हणून गायकांनाही श्रेय दिले जाते. आता सोशल मीडियाही खूप महत्त्वाचा ठरत आहे,'' असंही नेहा म्हणाली.
कामाचा विचार करता नेहा कक्कड अलिकडेच योयो हनी सिंग यांच्या मॉस्को सुका या गाण्यात दिसली होती. हे गाणे पंजाबी आणि रशियन भाषांचे मिश्रण होते.