मुंबई - प्रसिद्ध गायिका नेहा कक्कडच्या आवाजाचे करोडो लोक चाहते आहेत. तिच्या गाण्यांबरोबरच तिच्या डान्सच्या व्हिडिओंमुळे सोशल मीडियावरही प्रचंड चर्चा रंगली आहे. आजकाल नेहा कक्कड इंटरनेटवर भरपूर चर्चेत असते. तिची पंजाबी गाणी सध्या इंटरनेटवर प्रचलित आहेत. काही दिवसांपूर्वीच नेहा कक्कड तिच्या चाहत्यांसाठी आणखी एक पंजाबी गाणे 'खड तैनु में दासा' घेऊन आली आहे. तिचे हे गाणे बरीच हिट ठरले आहे. या गाण्यावर नाचताना तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 'खड तैनु में दासा' या पंजाबी गाण्यावर नेहा कक्कर भांगडा करताना दिसली. तिने हा भांगडा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तिने या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. व्हिडिओमध्ये नेहाने पर्पल कलर टॉप आणि ब्लॅक कलरचा प्लाझो घातला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
कॅप्शनमध्ये तिने 'बोट रॉकर्ससह मी माझी आवडती गाणी ऐकत आहे' असे लिहिले आहे. नेहा व्हिडिओमध्ये एका कंपनीची जाहिरात करत आहे. तिच्या या व्हिडिओवर आतापर्यंत ७ लाखाहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. तिचा पती रोहनप्रीतने तिच्या भांगडावर भाष्य आणि तिचे कौतुकही केले आहे. त्याने 'हाहाहा .. आय लव्ह यू एंड यू कॅटस्ट भांगडा' असे मिश्किलपणे लिहिले आहे.
‘खड तैनु में दासा’ गाणे नुकतेच रिलीज झाले आहे, ज्यामध्ये नेहा तिचा पती रोहनप्रीत सिंगसोबत दिसली आहे. नेहाचे हे गाणे तिच्या चाहत्यांना आवडत आहे. या गाण्यामुळे इंटरनेटवर धमाकेदार वातावरण निर्माण झाले आहे. सध्या नेहा कक्कड उत्तराखंडमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. तिथून काही फोटो तिने चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर पोस्ट करीत असते.
हेही वाचा - दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या हृदयावर झाली शस्त्रक्रिया!