मुंबई - ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यांची मुलगी रिद्धिमा कपूर यांनी ही माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे. आईसोबतचा एक फोटोही रिद्धिमाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
"तुम्ही सर्वांनी शुभेच्छा आणि प्रार्थना केल्याबद्दल धन्यवाद - माझ्या आईची आज कोरोना टेस्ट नेगेटिव्ह आली आहे ," असे रिद्धिमाने म्हटले आहे.
नीतू कपूर यांनी गुरुवारी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे म्हटले होते
गुरुवारी नीतू यांनी त्या कोविड पॉझिटिव्ह असल्याची पुष्टी केली होती. त्यांनी स्वत: ला क्वारंटाईन केलेले आहे आणि सुरक्षिततेच्या सर्व उपायांचे पालन करीत असल्याचे त्यांनी नमूद केले होते. त्यांनी इन्स्टाग्रामवर लिहिलं , “या आठवड्याच्या सुरुवातीला माझी कोविड -१९ टेस्ट पॉझिटिव्ह आली. सर्व सुरक्षा उपायांचे पालन केले जात आहे आणि तातडीने प्रतिसाद दिल्याबद्दल आणि आम्हाला मदत केल्याबद्दल मी अधिकाऱ्यांची आभारी आहे. मी क्वारंटाईनमध्ये आहे आणि माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घेत आहे. मला आता बरे वाटत आहे. मी तुमच्या प्रेम आणि समर्थनाबद्दल खूप कृतज्ञ आहे! कृपया सुरक्षित रहा, मास्क घाला, सुरक्षित अंतर ठेवा, स्वतःची काळजी घ्या. "
हेही वाचा - शेतकरी बांधवांचे दुःख पाहून वेदना होतात - धर्मेंद्र
‘जुग जुग जिओ’ चित्रपटाच्या सेटवर अनेकांना झाली कोरोनाची लागण
नीतू कपूर चंदिगडमध्ये त्यांच्या आगामी ‘जुग जुग जिओ’ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये होत्या. दरम्यान, ४ डिसेंबर रोजी त्यांच्या सहकारी कलाकार वरुण धवन आणि चित्रपटाचे दिग्दर्शक राज मेहता यांच्यासह त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची बातमी मिळाली आहे.
हेही वाचा - एक दशकानंतर प्रियदर्शन आणि अक्षय कुमार येणार एकत्र
यानंतर वरुणने सोशल मीडियावर या बातमीला दुजोरा दिला होता की त्याची कोरोनाव्हायरस टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
'जुग जुग जिओ' चित्रपटाचे शूट थांबविण्यात आले आहे. या चित्रपटात अनिल कपूर आणि कियारा अडवाणी यांच्याही भूमिका आहेत. त्यांच्या कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्या होत्या.