ETV Bharat / sitara

'बधाई हो' टीम पुन्हा आली एकत्र, यावेळी 'ज्यादा सावधान' - ayushmann khurana

'शुभ मंगल सावधान' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. यानंतर आता या चित्रपटाचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून याच चित्रपटासाठी आयुष्मान, नीना गुप्ता आणि गजराज राव हे त्रिकूट पुन्हा स्क्रीन शेअर करणार आहे

'बधाई हो' टीम पुन्हा आली एकत्र
author img

By

Published : Jul 15, 2019, 3:07 PM IST

मुंबई - आयुष्मान खुरानाच्या २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बधाई हो' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार यश मिळवले होते. या चित्रपटात नीना गुप्ता आणि गजराज राव यांनी आयुष्मानच्या आईवडिलांची भूमिका साकारली होती. त्यांच्या भूमिकेचेही प्रचंड कौतुक झाले होते. आता पुन्हा एकदा बधाई होची ही टीम एकत्र झळकणार आहे.

आयुष्मान आणि भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिका असलेला 'शुभ मंगल सावधान' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. यानंतर आता या चित्रपटाचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून शुभ मंगल ज्यादा सावधान, असं या चित्रपटाचं शीर्षक असणार आहे. याच चित्रपटासाठी आयुष्मान, नीना गुप्ता आणि गजराज राव हे त्रिकूट पुन्हा स्क्रीन शेअर करणार आहे.

  • #Update: Neena Gupta and Gajraj Rao, who won hearts in #BadhaaiHo, join the cast of #ShubhMangalZyadaSaavdhan... Stars Ayushmann Khurrana... Directed by Hitesh Kewalya... Produced by Aanand L Rai... Valentine Day 2020 release.

    — taran adarsh (@taran_adarsh) July 15, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हा चित्रपट समलैंगिक संबंधांवर आधारित असणार असून आयुष्मानच्या अपोझिट यात राजकुमार रावची वर्णी लागणार असल्याचे म्हटले जात आहे. आनंद एल राय या चित्रपटाची निर्मिती करणार असून हितेश केवाल्या यांचं दिग्दर्शन असणार आहे. हा चित्रपट २०२० मध्ये व्हेलंटाईन डेदिवशी म्हणजेच १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.