ETV Bharat / sitara

ड्रग कनेक्शनबाबत आजवर 'इतक्या' बॉलिवूड अभिनेत्रींची एनसीबीने केलीय चौकशी - Bollywood connections to drugs

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासादरम्यान देशातील मोठं ड्रग्ज कनेक्शन समोर आलं आहे. या ड्रग्ज प्रकरणात आत्तापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची चौकशी करण्यात आली होती. यात अभिनेत्री रिया चक्रवर्ती, दिपीका पदुकोन, सारा अली खान, श्रद्धा कपूर, भारती सिंहचा यात समावेश होता. या प्रकरणावर एक नजर टाकूयात...

'इतक्या' बॉलिवूड अभिनेत्रींची एनसीबीने केलीय चौकशी

author img

By

Published : Oct 23, 2021, 5:58 PM IST

मुंबई -बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासादरम्यान देशातील मोठं ड्रग्ज कनेक्शन समोर आलं आहे. या ड्रग्ज प्रकरणात आत्तापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची चौकशी करण्यात आली होती. यात अभिनेत्री रिया चक्रवर्ती, दिपीका पदुकोन, सारा अली खान, श्रद्धा कपूर, भारती सिंहचा यात समावेश होता. अलिकडेच एनसीबीने क्रूझवर टाकलेल्या छाप्यात शाहरुख खानचा मुलगा ड्रग प्रकरणात सापडला होता. त्याच्यासोबत हाय प्रोफाईल काही मित्रही होते. एनसीबीने त्यांना ताब्यात घेतले असून आर्यन आता आर्थर रोड तुरुंगात राहून जामीन मिळण्याची प्रतीक्षा करीत आहे.

'इतक्या' बॉलिवूड अभिनेत्रींची एनसीबीने केलीय चौकशी

अनन्या पांडेची होत आहे चौकशी

आर्यनकडे ड्रग सापडले नव्हते मात्र त्याच्या मोबाईलवर झालेल्या चॅटमधून त्याने ड्रग मिळवण्यासाठी प्रयत्न केल्याचे एनसीबीचे म्हणणे आहे. या चॅटशी संबंधित काहीजणांवर एनसीबी कारवाई करण्याच्या तयारीत असून चंकी पांडेची मुलगी अभिनेत्री अनन्या पांडे अडचणीत सापडली आहे. तिने आर्यनसोबत केलेल्या चॅटमध्ये ड्रगशी संबंधित गोष्टींवर संवाद साधला होता. त्यामुळे अनन्यालाही एनसीबीच्या कार्यालयात हजर रहावे लागले होते. एनसीबीची चौकशी जसजशी पुढे सरकत आहे तसे ड्रग प्रकरणात बॉलिवूडशी संबंधित नावे समोर येत आहेत.

सुशांत सिंह प्रकरणानंतर सुरू झाली ड्रग कनेक्शनची चर्चा

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येला दीड वर्ष पूर्ण झालं आहे. तो ड्रगचे सेवन करीत होता असा खुलासा चौकशीत झाल्यानंतर या प्रकरणात एनसीबीची एन्ट्री झाली. त्यानंतर सुशांतशी संबंधित रिया चक्रवर्तीचे नाव यात सर्व प्रथम समोर आले. तिची कसून चौकशी एनसीबीने केली. यात तिला काही काळ तरुंगवासही भोगावा लागला होता. त्यानंतर बॉलिवूडमधील अभिनेता, अभिनेत्री, मॉडेल्स यांची नावे ड्रग प्रकरणात जोडली गेली. यामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती, दिपीका पादुकोन, सारा अली खान, श्रद्धा कपूर यांच्या नावाचा समावेश होता.

सुशांत सिंह ड्रग चॅट प्रकरणातील इतर नावांचे पुढे काय झाले?

सुशांत सिंग राजपूत यांच्या मोबाईल मधील व्हाट्सअप चॅटमध्ये ड्रग्ज संदर्भातील चॅटमध्ये अनेक नावांचा उल्लेख असल्याची माहिती त्यावेळेस सूत्रांनी दिली होती. त्यामध्ये अनेक कलाकारांचे नावेदेखील होती. त्यामध्ये अभिनेत्री रिया चक्रवतीला काही दिवस जेलमध्ये देखील रहावं लागलं होतं. मात्र चॅटमध्ये असलेल्या इतर नावांवर एनसीबीने काय कारवाई केली हे आज पर्यंत कळू शकलेले नाही.

अभिनेत्री सारा आली खान आणि सुशांत सिंग ड्रग्ज कनेक्शन?

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री सारा अली खान यांची ओळख फेब्रुवारी २०१८ मध्ये केदारनाथ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान झाली होती. त्यानंतर सुशांत सिंह राजपूतशी तिची जवळीक निर्माण झाली, अशी साराअली खानने कबुली दिली होती. चित्रपटाच्या शूटिंगनंतर ती सुशांतच्या घरी 'कॅपरी हाऊस'मध्ये बर्‍याच वेळा भेटायची. साराने सुशांतसोबत अनेकदा लोणावळ्याच्या फार्म हाऊसवर गेले असल्याचेही सांगितले होते. सुशांत सिंह राजपूत आत्महत्येनंतर व्हाट्सअप चॅटमध्ये देखील सारा अली खानचा उल्लेख असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. त्यावेळी चौकशी दरम्यान यांची एनसीबीला सारा अली खानने सुशांतच्या ड्रग सेवनाबाबत भाष्य केलं होतं. केदारनाथ सिनेमाच्या शूटिंगच्यावेळी सुशांत गांजा घेत होता का व त्याला व्यसन होते का, या प्रश्नासह थायलंड ट्रिपबद्दलही काही प्रश्न एनसीबीने सारा अली खानला विचारले होते. शुटिंगच्यावेळी सुशांत गांजा, चरस घेत होता, सेटवर बहुतांशजणाना त्याबद्दल माहिती होती. आपण मात्र कधीही त्याचे सेवन केले नाही, तसेच कोणत्याही ड्रग तस्कराला ओळखत नसल्याची माहिती साराने एनसीबीला दिली होती.

श्रद्धा कपूर- सुशांत सिंह ड्रग्स कनेक्शन?

सुशांत सिंह ड्रग प्रकरणात अनेक अभिनेत्रींच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला होता. त्यात शक्ती कपूरची मुलगी श्रध्दा कपूरलाही एनसीबीने चौकशीसाठी बोलवले होते. यावेळी श्रध्दाने अनेक खुलासे केले होते. छिछोरे सिनेमाच्या दरम्यान श्रध्दा आणि सुशांत एकत्र काम करीत होते. त्यावेळी झालेल्या पार्ट्यांमध्ये सुशांत ड्रग सेवन करीत होता, मात्र आपण कधीही सेवन केले नव्हते असे तिने चौकशीत सांगितले होते.

दीपिका पदुकोन ड्रग्स कनेक्शन?

दीपिका पदुकोणच्या चॅटवरुन तिची एनसीबीने ड्रग प्रकरणी चौकशी केली होती. तिची मॅनेजर करिष्मा प्रकाश आणि दीपिका यांच्यात ड्रग बाबत चॅट झाले होते असा संशय एनसीबीला होता. त्यानंतर दीपिका व करिष्मा प्रकाश यांची वेगवेगळी चौकशी एनसीबीने केली. त्यावेळी दोघीचे मोबाईल फोन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. सुमारे दीड तासानंतर करिष्माला तिच्यासमोर बसवून पाच अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. व्हाट्सअप चॅट, कोको पार्टीबाबत सविस्तर विचारणा करण्यात आली. तिने ऍडमिन असलेल्या व्हॉटस अप ग्रुपवर तसे जयाबरोबरील ड्रग्स चॅटची कबुली दिली. मात्र आपण कधीही ड्रग्ज सेवन केले नसल्याचे दीपिकाने सांगितले होते.

स्टार किड्स एनसीबीच्या रडारवर?

एनसीबीने बॉलिवूडमधील अनेकांकडे ड्रग संबंधी चौकशी केली आहे. काहीजण संशयाच्या भोवऱ्यात आहेत तरी काहींना विनाकारण गुंतवल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगत असते. सुशांत सिंहच्या मृत्यूची चौकशी सुरू असताना बॉलिवूड ड्रग कनेक्शनची चर्चा सुरू झाली आणि अनेकांना तुरुंगाची हवा दाखवत एनसीबीने आपली कारवाई सुरूच ठेवली आहे. याचाच भाग म्हणून आर्यन खान अद्याप गजाआड आहे. एनसीबीच्या पुढील कारवाईत आणखी काही स्टार किड्सची नावे असतील का हा प्रश्न बॉलिवूडसह सर्वांनाच पडला आहे.

हेही वाचा - मेहमूदची बहीण मिनू मुमताझ यांचे निधन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.