मुझ्झफरनगर - बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या कुटुंबीयांना १४ दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार आहे. मुझ्झफरनगरमधील बुधना येथील घरात ते क्वारंटाईनमध्ये राहणार आहेत.
नवाज आणि त्याच्या कुटुंबीयांचे मेडिकल स्क्रीनिंग करण्यात आले. याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तो आपल्या कुटुंबीयांसह १५ मे रोजी ट्रॅव्हल पास घेऊन घरी पोहोचला होता. त्यामुळे त्याला क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार आहे.
नवाजुद्दीनसोबत त्याची आई, भाऊ, मेव्हणी यांनी एका खासगी वाहनातून प्रवास केला होता. त्याला प्रवासामध्ये २५ ठिकाणी मेडिकल स्क्रीनिंगचा सामना करावा लागल्याचे नवाजने पत्रकारांना सांगितले.
बुधना पोलीस सर्कलमधील स्टेशन हाऊस ऑफिसर कुशालपाल सिंग यांनी सांगितले की, आरोग्य अधिकाऱ्यांनी त्याच्या घरी भेट दिली आणि त्याला व त्याच्या कुटुंबीयांना १४ दिवस क्वारंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला दिला.