ETV Bharat / sitara

‘माझी तब्येत जॉन अब्राहम एवढी ‘अमेझिंग’ नसली तरी चांगली आहे’ - शाहरुख खान - शाहरुखचा आगामी चित्रपट

नुकताच शाहरुख खानने त्याच्या चाहत्यांसोबत संवाद साधला ज्यात त्याला त्याच्या तब्यतीविषयी विचारण्यात आले. त्यावर तो त्याच्या नेहमीच्या थट्टेखोर स्वभावात उत्तराला, ‘माझी तब्येत जॉन अब्राहम एवढी ‘अमेझिंग’ नसली तरी चांगली आहे’.

shahrukh-khan
शाहरुख खान
author img

By

Published : Jun 26, 2021, 7:11 PM IST

सध्या बॉलिवूडमध्ये चित्रपटांतील भूमिकांगणिक शरीराची ठेवण बदलण्याची फॅशन आहे. बॉलिवूडकर हल्ली आपल्या भूमिकांवर मेहनत घेताना दिसतात. आमिर खानने ‘दंगल’ साठी वयस्क कुस्तीगीर महावीर सिंग फोगाटची भूमिका निभावताना, तसेच दोन तरुण मुलींचा पिता दिसण्यासाठी भरमसाठ वजन वाढविले होते. नंतर त्याने वजन कमी केले आणि मग तरुण कुस्तीगीर फोगाट रंगविला. आताही ‘लाल सिंग चढ्ढा’ साठीही त्याने वजन कमी जास्त करीत आपली भूमिका साकारली आहे. तसेच एका मल्लाची भूमिका निभावताना ‘सुलतान’ चित्रपटासाठी सलमान खानने वजन वाढविले होते. ‘वजन वाढवायला सोप्प असतं, परंतु ते कमी करताना जीव जातो’, तो एका मुलाखतीत म्हणाला.

shahrukh-khan
शाहरुख खान

शाहरुख खानने ‘ओम शांती ओम’, जो सुभाष घई दिग्दर्शित व ऋषी कपूर अभिनित ‘कर्ज’ चा रिमेक होता. या चित्रपटात पहिल्यांदाच (सलमान खान प्रमाणे) पडद्यावर शर्ट काढला परंतु त्याआधी त्याने (सलमान खान सारखीच) पिळदार शरीरयष्टी कमावली. त्या चित्रपटाची दिग्दर्शिका फराह खानला त्याने प्रॉमिस केलेले होते की पडद्यावरील पहिला ‘शर्टलेस’ शॉट तिच्या पिक्चरसाठी असेल. खरंतर ‘सिक्स पॅक ऍब्स’चा फंडा त्याने फेमस केला. जॉन अब्राहम हा नेहमीच पिळदार शिरीरयष्टीसाठी ओळखला जातो. ‘जॉन फक्त हँडसम दिसतो, अभिनयात कच्चा आहे’, असे त्याच्याबद्दल बोलले जात असे त्यावर तो नेहमी हसून सांगत असे, ‘मी हँडसम दिसतोय ना? माझ्यासाठी तेही महत्वाचे आहे’. नुकताच शाहरुख खानने त्याच्या चाहत्यांसोबत संवाद साधला ज्यात त्याला त्याच्या तब्यतीविषयी विचारण्यात आले. त्यावर तो त्याच्या नेहमीच्या थट्टेखोर स्वभावात उत्तराला, ‘माझी तब्येत जॉन अब्राहम एवढी ‘अमेझिंग’ नसली तरी चांगली आहे’.

शाहरुखच्या विनोदबुद्धीचे अजून एक उदाहरण म्हणजे त्याला एका फॅन ने विचारले की, ‘रेड चिलीजच्या किचन मध्ये काज शिजतंय?’ रेड चिलीज शाहरुखच्या निर्मितीसंस्थेचे नाव आहे. त्यावर तो मिश्कीलपणे म्हणाला, ‘बरेच मसालेदार चित्रपट.’ शाहरुख खान दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचा आवडता अभिनेता आहे. त्यांच्या पहिल्या चित्रपटात, ‘मुन्नाभाई एम बी बी एस’ मध्ये, आधी शाहरुख मुन्नाभाईच्या भूमिकेत होता व काही भागांचे शुटिंगही झाले होते. परंतु त्यावेळी पाठीवरील शस्त्रक्रियेसाठी अमेरिकेला जावे लागले आणि मग त्याच्याजागी संजय दत्तची वर्णी लागली. आताही शाहरुख आणि राजकुमार हिरानी एकत्र काम करणार आहेत, अशा बातम्या येत असतात त्यामुळे एका फॅनने एसआरके ला त्याविषयी विचारले असता तो व्यंगात्मक रीतीने उत्तराला, ‘मी आत्ताच राजकुमार हिरानी ला फोन लावतो आणि विचारतो, ते पण माझ्यासारखेच लेट झोपतात.’ आणि ‘आत्ता तुम्ही जीवनाच्या कोणत्या टप्प्यावर आहेत?’ या प्रश्नावर शाहरुख बोलला, ‘पुनर्बांधणी’.

shahrukh-khan
शाहरुख खान

दोन तीन वर्षे शाहरुख खानचा चित्रपट नाहीये. ‘जब हॅरी मेट सेजल’, ‘झिरो’, ‘रईस’ हे त्याचे चित्रपट सपशेल आपटले होते. दोन तीन फ्लॉप्स नंतर शाहरुखने जाणूनबुजून ब्रेक घेतला आपले काय चुकतेय हे जाणून घेण्यासाठी. आणि आता तो आपल्या करियरची ‘पुनर्बांधणी’ करतोय. तो नवीन चित्रपटांसाठी सज्ज असून त्याने मुंबईत ‘पठाण’ चित्रपटाचे चित्रीकरण पुन्हा सुरु केले असून काही दिवसांतच दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम त्याला जॉईन होतील.

शाहरुख खान म्हणतो की आतापर्यंतचा माझा प्रवास मस्त होता आणि तुमचे मनोरंजन करीत अजूनही खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे.

हेही वाचा -'माझा होशील ना' मध्ये दिसणार पिस्तूल आणि गोळीबार!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.