ETV Bharat / sitara

Atharva: The Origin ग्राफिक नॉवेलमध्ये 'असा' आहे धोनीचा 'महादेव लूक'; फेसबुकवर शेअर केला टिझर - The new incarnation of Mahi

कॅप्टनकूल महेंद्रसिंग धोनीने (Captain Cool Mahendra Singh Dhoni) खेळाच्या क्षेत्राव्यतिरिक्त एक नवीन इनिंग सुरू केली आहे. खरं तर, धोनीची एक ग्राफिक नॉवेल येत आहे, ज्याचा फर्स्ट लूक कॅप्टन कूलने शेअर केला आहे. या टीझरमध्ये धोनीच्या लूकला सोशल मीडियावर चांगलीच दाद मिळत आहे.

Mahendra Singh Dhoni
महेंद्रसिंग धोनी
author img

By

Published : Feb 3, 2022, 4:53 PM IST

हैदराबाद : भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस (Former captain MS Dhoni) धोनी एक मोठा धमाका करणार आहे. धोनी खेळाच्या मैदाना व्यतिरिक्त एका नव्या इनिंगची सुरुवात करत आहे. धोनीचे एक ग्राफिक नॉवेल येत (A graphic novel by Dhoni) आहे. ज्याचा फर्स्ट लुक कॅप्टनकूल एमएस धोनीने शेअर केला आहे. या टीझरमधील धोनीच्या लुकला सोशल मीडियावर चांगली पसंती मिळत आहे.

बुधवारी धोनीने आपल्या फेसबुकच्या वॉलवर आपल्या ग्राफिक नॉवेल 'अथर्व: द ओरिजिन' (Atharva: The Origin) चा टिझर शेअर केला आहे. यात तो अथर्व नावाच्या सुपरहिरोच्या भूमिकेत दिसत आहे. आता धोनीने याची एक झलक सोशल मीडियावर शेअर करताच प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात लायक्स केले आहेत. माहीचा नवा अवतार पाहून (The new incarnation of Mahi) त्याच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू परतले असून त्याला तो प्रचंड आवडला आहे. चाहत्यांना आता या नॉवेलच्या प्रकाशनाची प्रतीक्षा आहे.

काय आहे टिझरमध्ये?

ग्राफिक नॉवेल 'अथर्व: द ओरिजिन' (Atharva: The Origin) पूर्णपणे एक ग्राफिकल आणि एनिमेटेड आहे. टिझरमध्ये सुरुवातीला काही राक्षसांची झलक पाहायला मिळते. यानंतर धोनीचे विराट पात्र अथर्वच्या रूपात दिसते.

नॉवेलवर धोनीची रिएक्शन-

आपल्या या नॉवेलबद्दल धोनी खुप खुश आहे. यावर बोलताना धोनी म्हणाला, 'या प्रकल्पाशी जोडले गेल्याने मी रोमांचित आहे. अथर्व - द ओरिजिन ही एक आकर्षक कादंबरी आहे, ज्याची कथा खूपच आकर्षक आहे. यामध्ये तुम्हाला उत्तम कलाकृती पाहायला मिळतील, लेखक रमेश थमिलमनी यांनी भारतातील पहिली दिग्गज सुपरहिरो कादंबरी सादर केली आहे. तीही समकालीन वळण घेऊन, जी वाचकांमध्ये उत्सुकता निर्माण करेल. तत्पुर्वी या कादंबरीवर अनेक वर्षे काम सुरू होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.