मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या चंदीगडच्या खासदार किरण खेर यांना ब्लड कॅन्सर झाला आहे. सध्या त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत. ही बातमी कळताच बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रात चिंतेचे वातावरण पसरले आहे. दिग्गज अभिनेता अनुपम खेर यांनीही या बातमीला दुजोरा दिला आहे.
किरण खेर यांना मल्टीपल मायलोमाचे निदान झाले आहे. हा एक प्रकारचा रक्ताचा क्षयरोग आहे. सध्या किरण यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत. त्या लढाऊ असल्यामुळे या आजाराचा मुकाबला करतील. त्यांच्यासाठी प्रार्थना करीत रहा असे एका निवेदनात अनुपम खेर आणि त्यांचा मुलगा सिकंदर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - अभिनेता रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर