ETV Bharat / sitara

अमिताभ यांनी मुलीबद्दल केलेल्या कौतुकाचा मोहनलाल यांना गर्व - बिग बीच्या कौतुकाचा मोहनलाल यांना गर्व

सुपरस्टार मोहनलाल यांची मुलगी विस्मया हिने लिहिलेल्या 'ग्रेन्स ऑफ स्टारडस्ट' या पुस्तकाबद्दल अमिताभ बच्चन यांनी पत्र पाठवून कौतुक केले आहे. या पुस्तकात कविता आणि प्रतिमांचा खूबीने वापर केला गेला आहे. व्हॅलेंटाईन डेला हे पुस्तक पब्लिश झाले होते. याची एक प्रत मोहनलाल यांनी बिग बींना पाठवली होती.

Mohanlal
सुपरस्टार मोहनलाल
author img

By

Published : Feb 23, 2021, 5:14 PM IST

मुंबई - मल्याळम अभिनेता मोहनलाल यांची मुलगी विस्मया मोहनलाल हिने लिहिलेले 'ग्रेन्स ऑफ स्टारडस्ट' हे पुस्तक वाचून अमिताभ यांनी पत्र पाठवले आहे. बिग बी यांनी मुलीचे कौतुक केल्यामुळे मोहनलाल यांना अभिमान वाटत आहे. अमिताभ यांनी विस्मया मोहनलालकडे असलेल्या प्रतिभेचे कौतुक केले आहे.

विस्मयाने बनवलेल्या कविता आणि प्रतिमांचा समावेश असलेले हे पुस्तक गेल्या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रकाशित झाले होते. मोहनलाल यांनी पुस्तकाची एक प्रत अमिताभ बच्चन यांना पाठविली होती.

Grains Of Stardust
'ग्रेन्स ऑफ स्टारडस्ट'

बिग बीने मोहनलाल यांच्या मुलीला तिच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि सांगितले की हे पुस्तक कविता आणि चित्रांचा सृजनशील संवेदनशील प्रवास प्रदान करते. प्रतिभा आनुवंशिक आहे असेही त्यांनी नमूद केले आहे.

मोहनलाल यांनी बिग बीने कौतुक केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. बच्चन यांनी पाठवलेल्या शुभेच्छा व मुलीचे केलेले कौतुक वडील म्हणून हा त्यांच्यासाठी अभिमानाचा क्षण होता, असे मोहनलाल यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - मनोरंजक :राजकुमार हिराणीच्या चित्रपटात शाहरुखसोबत तापसी पन्नू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.