ETV Bharat / sitara

'मिशन मंगल' मराठीत डब करू नका, अन्यथा गाठ राजसाहेबांच्या महाराष्ट्र सैनिकांशी - सिनेमा

प्रेक्षकांना चांगले सिनेमे पाहायला मिळावेत, ही आमची भूमिका आहेच. मात्र, एखाद्या विशिष्ट भाषिक इंडस्ट्रीचा अपमान आणि नुकसान करण्याचा हक्क कोणालाही नाही. मिशन मंगल हा सिनेमा मराठीत प्रदर्शित झाल्यास, गाठ राजसाहेबांच्या महाराष्ट्र सैनिकांशी आहे, असा इशारा शालिनी ठाकरे यांनी दिला आहे.

'मिशन मंगल' मराठीत डब करू नका
author img

By

Published : Aug 3, 2019, 3:27 PM IST

मुंबई - नुकताच अक्षय कुमारच्या 'मिशन मंगल' चित्रपटाचा मराठी प्रोमो प्रदर्शित झाला. यानंतर मनसेने याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मिशन मंगल सिनेमा मराठीत डब करून प्रदर्शित करण्याची हिंमत करू नये, अन्यथा गाठ राजसाहेबांच्या महाराष्ट्र सैनिकांशी आहे, अशा आशयाचे ट्विट मनसे चित्रपट सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी केले आहे.

ट्विटमध्ये त्या म्हणाल्या, मराठी सिनेमांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने आजवर अनेकदा बॉलिवूडच्या निर्मात्यांना इशारा दिला आहे. पण दरवेळी ते हिच चूक करतात, हे पटण्यासारखं नाही. मिशन मंगल हा हिंदी सिनेमा मराठीत डब करून महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यात येणार आहे. मराठी सिनेमांच्या खेळाच्या वेळा हा डब सिनेमा लाटणार आहे. त्यामुळे मराठी सिनेमांना शो मिळणार नाहीत. मराठी सिनेसृष्टीचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ न देण्यासाठी मनसे चित्रपट सेना वचनबद्ध आहे. पूर्वीही आम्ही एम.एस.धोनी डब करून मराठीत प्रदर्शित करण्यास विरोध केला होता.

Intro:Body:

kiran

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.