अमिताभ बच्चन आणि ‘केबीसी’ हे अतूट नाते आहे. ते स्पर्धकांचे दडपण दूर करतात आणि गप्पा मारत कार्यक्रमाची मजा वाढवितात. येत्या शुक्रवारी केबीसीच्या शानदार शुक्रवारच्या भागात अमिताभ बच्चन, ‘आनंद’ चित्रपटाने त्यांच्या आयुष्यात काय बदल घडवून आणला याबद्दल सर्वांना अवगत करणार आहेत. आपण आपल्या जीवनाच्या एखाद्या टप्प्यावर यश आणि कीर्ती यांची कामना करत असतो. पण एक गोष्ट अशी आहे, जी आपण सगळ्यांनीच कबूल केली पाहिजे की, कीर्ती, यश आणि स्वीकार या गोष्टी अगदी अनपेक्षित क्षणी आपल्या जीवनात येतात.
या शो मध्ये अमिताभ बच्चन आपला एक अनुभव सांगतील, जेव्हा चित्रपटातील त्यांच्या परफॉर्मन्समुळे लोक त्यांच्याकडे टक लावून पाहात असल्याचा अनुभव त्यांना आला. ते म्हणाले, “मी ‘आनंद’चे शूटिंग पूर्ण केले होते आणि चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्या दिवशी तो प्रदर्शित झाला, तेव्हा मी माझ्या मित्रांची कार घेऊन गेलो होतो. कारण तेव्हा माझ्याकडे कार नव्हती आणि पेट्रोल भरायला पैसेही नव्हते. मला कोणाकडून तरी ५-१० रुपये उसने घ्यावे लागले होते, जे घेऊन मी जवळच्या पेट्रोल पंपावर गेलो, पेट्रोल भरून घेतले आणि पैसे दिले.”
बिग बींच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट
महानायक अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतही असेच काहीसे झाले होते. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती १३ मध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितले की त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट कोणता होता आणि चित्रपट उद्योगात एक अभिनेता म्हणून मान्यता मिळाल्यानंतरचा त्यांचा प्रवास कसा होता. या शुक्रवारी शानदार शुक्रवारच्या भागात ते पाहुणे कलाकार पंकज त्रिपाठी आणि प्रतीक गांधी यांना त्या प्रसंगाबद्दल सांगतील जेव्हा एका पेट्रोल पंपवर लोक त्यांच्याकडे टक लावून पाहात होते. त्यासोबतच बच्चन सर त्यांच्यासोबत भरपूर मस्ती आणि मनोरंजन असणार आहे.
बिग बी पुढे म्हणाले की, “सकाळी, मी दुसर्या एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी जात होतो आणि कारमधले पेट्रोल संपले. मी पुन्हा त्याच पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेलो. पंकज त्रिपाठी आणि प्रतीक गांधी सर मी सांगू इच्छितो की जेव्हा पुन्हा पेट्रोल भरायला गेलो, तेव्हा तेथे ४-५ लोक उभे होते आणि मला पाहात होते. दरम्यानच्या काळात आनंद चित्रपट प्रदर्शित होऊन गेला होता. तेव्हा माझ्या लक्षात आले की, लोक मला ओळखू लागले आहेत आणि मी काही तरी चांगले केले आहे.”
पंकज त्रिपाठी आणि प्रतीक गांधी हॉटसीटवर
या व्यतिरिक्त, येत्या शुक्रवारच्या भागात पाहुणे कलाकार पंकज त्रिपाठी आणि प्रतीक गांधी हॉटसीटवर विराजमान असणार आहेत. ते ज्या कार्याचे समर्थन करतात अशा सामाजिक कार्यासाठी हा खेळ खेळतील. यात जिंकलेली रक्कम पंकज त्रिपाठी आणि प्रतीक गांधी अनुक्रमे पंडित बनारस तिवारी हेमनवंती देवी फाऊंडेशनला आणि मुकुल ट्रस्टला दान करतील.
‘कौन बनेगा करोडपती’ चा शानदार शुक्रवार १ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होणार आहे.
हेही वाचा - कीर्तनकार शिवलीला पाटील ‘या’ कारणासाठी गेल्या बिग बॉस मराठीच्या घराबाहेर!