मुंबई - संगीताचे वेडे आपल्याला सगळ्या भाषेत, सगळ्या प्रांतात अगदी जगभर दिसतात. संगीतातील जादुई स्वर आणि तालाने माणसे डोलू लागतात. पण पक्षीही आनंदाने संगीताच्या तालावर डोलतात हा अनुभव भन्नाट आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय. यात सिम्बा चित्रपटातील 'आंख मारे ओ लड़की आंख मारे' या गाण्यावर एक पक्षी शिट्ट्या मारत नाचताना दिसतोय.
-
My girlfriend sent me this and I think you guys should see it too. pic.twitter.com/4J3vyjJpbS
— . (@AyeChampa) July 25, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">My girlfriend sent me this and I think you guys should see it too. pic.twitter.com/4J3vyjJpbS
— . (@AyeChampa) July 25, 2019My girlfriend sent me this and I think you guys should see it too. pic.twitter.com/4J3vyjJpbS
— . (@AyeChampa) July 25, 2019
घरात एक पक्षी विहार करताना व्हिडिओत दिसतो. दरम्यान टीव्हीवर गाने 'आंख मारे ओ लड़की आंख मारे' हे गाणे सुरू होते. तातडीने पक्षी उडत सोफ्यावर येतो आणि टीव्ही पाहायला लागतो. या गाण्याच्या तालावर तो शिट्ट्या मारायला लागतो.
रणवीर सिंग हा प्रचंड एनर्जी असलेला अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याच्या या एनर्जीवर लोक तर थिरकतातच. या गाण्यावर सारा अली खाननेही रणवीरच्या तोडीस तोड डान्स केलाय. पण इथे तर दोघांनी आपल्या तालावर चक्क पक्षाला नाचायला भाग पाडले आहे.