ETV Bharat / sitara

दिग्गज कलाकारांचा भरणा असलेल्या 'सैरा'चा थक्क करणारा मेकिंग व्हिडिओ

सैरा या सिनेमाचा डोळ्यांची पारणे फेडणारा मेकिंग व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे. भव्य दव्य सेट आणि जबरदस्त अॅक्शन सीन असलेल्या सैरा नरसिम्हा रेड्डी सिनेमाचा हा थरारक व्हिडिओ चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवणारा आहे.

author img

By

Published : Aug 14, 2019, 7:33 PM IST

'सैरा'चा थक्क करणारा मेकिंग व्हिडिओ

मुंबई - दाक्षिणात्य आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांचा भरणा असलेल्या सैरा चित्रपटाच्या स्टारकास्टची काही वेळापूर्वीच घोषणा करण्यात आली. या कलाकारांना पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते आतुर असतानाच आता या सिनेमाचा डोळ्यांची पारणे फेडणारा मेकिंग व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे.

भव्य दव्य सेट आणि जबरदस्त अॅक्शन सीन असलेल्या सैरा नरसिम्हा रेड्डी सिनेमाचा हा थरारक व्हिडिओ चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवणारा आहे. बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन, कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीप, विजय सेतुपती, नयनतारा, तमन्ना आणि रवीकिशनसारख्या अनेक कलाकारांची झलक या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटीशांविरुध्द एल्गार पुकारणााऱ्या आंध्र प्रदेशातील एका स्वातंत्र्य सैनिकाची ही सत्यकथा आहे. सुरेंद्र रेड्डी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून राम चरण या चित्रपटाचा निर्माता आहे. हा चित्रपट हिंदीसह दाक्षिणात्य भाषांमध्ये रिलीज होणार. रितेश सिध्दवानी आणि फरहान अख्तर या चित्रपटाचे हिंदीमध्ये वितरण करणार आहेत.

Intro:Body:

news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.