ETV Bharat / sitara

Making Video: चॉकलेट बॉयपासून ड्रीम गर्ल बनण्यासाठी आयुष्मानला घ्यावी लागली प्रचंड मेहनत - मेकअप

या सिनेमाच्या तुफान विनोदी ट्रेलरला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. यात आयुष्मान एका कॉल सेंटरमध्ये काम करताना दिसला. यावेळी मुलींच्या आवाजात बोलून त्याने अनेकांना घायाळ केल्याचे पाहायला मिळाले. याच आवाजामागची आणि मुलीसारखा मेकअप करण्यासाठी लागणारे कष्ट दाखवणारा चित्रपटाचा मेकींग व्हिडिओ निर्माती एकता कपूर हिने शेअर केला आहे.

ड्रीम गर्ल बनण्यासाठी आयुष्यमानला घ्यावी लागली प्रचंड मेहनत
author img

By

Published : Sep 5, 2019, 8:23 PM IST

मुंबई - नुकतंच आपल्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार पटकवणारा आयुष्मान खुराणा आपल्या आगामी ड्रीम गर्ल चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकण्यास सज्ज झाला आहे. या सिनेमाच्या तुफान विनोदी ट्रेलरला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली.

हेही वाचा - सोनम कपूर 'अंधेरीचा राजा'च्या चरणी नतमस्तक, 'द झोया फॅक्टर'साठी प्रार्थना

यात आयुष्मान एका कॉल सेंटरमध्ये काम करताना दिसला. यावेळी मुलींच्या आवाजात बोलून त्याने अनेकांना घायाळ केल्याचे पाहायला मिळाले. याशिवाय कधी तो रामायणातील सीतेच्या भूमिकेत दिसला तर कधी इतर काही महिलांची पात्र साकारताना. यातील आयुष्मानचा हुबेहूब मुलीसारखा असणार आवाज प्रेक्षकांनाही चांगलाच भाळला.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

याच आवाजामागची आणि मुलीसारखा मेकअप करण्यासाठी लागणारे कष्ट दाखवणारा चित्रपटाचा मेकींग व्हिडिओ निर्माती एकता कपूर हिने शेअर केला आहे. यात आयुष्मान सांगत आहे, की पुजाचा हा आवाज डब करताना कधी कधी १० रीटेक घ्यावे लागत, तर मेकअपसाठीही कमीत कमी अडीच तास लागत असतं. आयुष्मानचा चॉकलेट बॉयपासून ड्रीम गर्ल बनण्यापर्यंतचा प्रवास ऐका त्याच्याचकडून.

हेही वाचा - बच्चन साहेबांच्या 'जलसा' बंगल्यातही शिरले होते पाणी, व्हिडिओ व्हायरल

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.