मुंबई - मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टी धामीलाही करोनाची लागण झाली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट करून अभिनेत्रीने याबाबत माहिती दिली आहे. अभिनेत्रीच्या पोस्टनंतर, करण ग्रोव्हर, अरिजित तनेजा, डिनो मोरिया या सेलिब्रिटींनी दृष्टीला लवकर बरे होण्यासाठी धीर दिला आहे.
आतापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना करोनाचा फटका बसला आहे. आता मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टी धामीलाही करोनाची लागण झाली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट करून तिने ही माहिती दिली आहे. दृष्टीने आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये लिहिले आहे की, तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी मला साथ देण्यासाठी काही चांगल्या गोष्टी उपस्थित आहेत. सुदैवाने मी या फुलांचा सुगंध घेऊ शकते आणि चॉकलेटचा आनंद घेऊ शकते. दृष्टीने सोबत एक फोटोदेखील पोस्ट केले आहे ज्यात टेबलवर फुलांचा गुच्छ, ऑक्सिमीटर, टॅब्लेट, विक्स, चॉकलेट आणि काही कागदं ठेवलेले आहेत.
अभिनेत्री दृष्टी धामी 'मधुबाला एक इश्क एक जुनून', 'एक था राजा एक थी रानी' आणि 'सिलसिला बदलते रिश्तों का' सारख्या टीव्ही शोमधील तिच्या भूमिकांसाठी सर्वात जास्त लक्षात राहते. दृष्टी शेवटची वेब सीरिज 'द एम्पायर' मध्ये दिसली होती जिथे तिने खानजादा बेगमची भूमिका केली होती.
हेही वाचा - विकी कौशलचे वडील शाम कौशल यांचा वर्कआऊट व्हिडिओ व्हायरल