ETV Bharat / sitara

'मॅडम चीफ मिनीस्टर' ट्रेलर : राजकीय डावपेचांचा थरारक खेळ - सुभाष कपूर यांनी दिग्दर्शन केले

रिचा चढ्ढाची मुख्य भूमिका असलेला "मॅडम चीफ मिनीस्टर" या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. यात रिचा चढ्ढा, मानव कौल,सौरभ शुक्ला, अक्षय ओबेरॉय आणि शुभ्राज्योती यांच्या मुख्य भूमिका या चित्रपटाची निर्मिती टी-सीरिज फिल्म आणि कांगडा टॉकीज यांनी केली आहे.

Madam Chief Minister trailer
'मॅडम चीफ मिनीस्टर' ट्रेलर
author img

By

Published : Jan 6, 2021, 3:30 PM IST

मुंबई - अभिनेत्री रिचा चढ्ढाची मुख्य भूमिका असलेला "मॅडम चीफ मिनीस्टर" या चित्रपटाचा जोरदार संघर्ष असलेला बहुप्रतीक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. या राजकीय चित्रपटाचे प्रदर्शन २२ जानेवारीला थिएटरमध्ये होणार आहे. ‘जॉली एलएलबी’ फेम सुभाष कपूर यांनी या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे.

या चित्रपटाची कथा उत्तर प्रदेशच्या पर्श्वभूमीवर मांडण्यात आली आहे. एका प्रमाणिक मास्टरजीकडे आश्रीत म्हणून आलेल्या एका तडफदार युवतीची ही गोष्ट आहे. राजकीय संघटन मजबूत करण्यापासून ते सत्ता संपादन करण्यापर्यंतचा खडतर प्रवास ती करते. यात तिच्यासाठी अनेक अडथळे येतात. मुख्यमंत्री झाल्यानंतरही तिचे सरकार पाडण्यासाठीचे कारस्थान रचले जाते. ते ती कशे उधळते याच्या रंजक गोष्टी यात गुंफण्यात आल्या आहेत.

हेही वाचा -तापसी पन्नूच्या 'रश्मी रॉकेट' सिनेमाच्या शूटिंगची गुजरातमध्ये तयारी

या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे रिचा चढ्ढाने. मुख्यमंत्र्याच्या भूमिकेतील रिचाच्या तोंडी अनेक लोकप्रिय डायलॉग आहेत. ट्रेलरमधून चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढू शकेल. मॅडम चीफ मिनिस्टर हा राजकीय नाट्य असलेला चित्रपट २२ जानेवारी थिएटरमध्ये झळकेल. यात रिचा चड्ढा, मानव कौल,सौरभ शुक्ला, अक्षय ओबेरॉय आणि शुभ्राज्योती यांच्या मुख्य भूमिका या चित्रपटाची निर्मिती टी-सीरिज फिल्म आणि कांगडा टॉकीज यांनी केली आहे.

हेही वाचा - अभिनेत्री अमिषा पटेलचे हॅक झालेले इंस्टाग्राम अकाउंट पुन्हा रिकव्हर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.