ETV Bharat / sitara

कंगना आज कोर्टात हजर न राहिल्यास तिच्या विरोधात अटक वॉरंट निघण्याची शक्यता

अभिनेत्री कंगना राणावत आज कोर्टात हजर न राहिल्यास तिच्या अडचणी वाढणार आहेत. गीतकार जावेद अख्तर यांनी तिच्या विरोधात मानहाणीचा दावा ठोकला आहे. पणं कंगना सुनावणीला हजर राहत नाही. त्यामुळे ती आज न्यायालयात हजर राहिली नाही तर आम्ही अटक वॉरंट काढू, असा अंधेरी कोर्टाकडून कंगणाला सूचक इशारा देण्यात आला आहे.

Kangana Ranaut
Kangana Ranaut
author img

By

Published : Sep 20, 2021, 10:56 AM IST

मुंबई : गीतकार जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना रणौत विरोधात मानहाणीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणी कंगनाला वेळोवेळी नोटीस बजावली आहे. त्यानंतरही ती कोर्टात हजर झाली नाही. त्यामुळे तिला आज २० सप्टेंबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर ती आज न्यायालयात हजर राहिली नाही तर आम्ही अटक वॉरंट काढू, असा अंधेरी कोर्टाकडून कंगणाला सूचक इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आज कंगना कोर्टात हजर न राहिल्यास तिच्या विरोधात कोर्टाकडून अटक वॉरंट काढले जाण्याची शक्यता आहे.

आज अंधेरी कोर्टात सुनावणी
जावेद अख्तर यांनी कंगना रानौत विरोधात मानहाणीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कंगनाला दिलासा दिला नव्हता. त्यामुळे अंधेरी कोर्टात हजर होणे कंगानाला अनिवार्य होते. १४ सप्टेंबरला याबाबत सुनावणी झाली असता कंगनाला कोरोनाचे लक्षणे आढळली. तिची कोविड चाचणी झाली. रिपोर्टसाठी विलंब होत असल्याचे कंगनाचे वकील ऍड सिद्दिकी यांनी कोर्टाला सांगितले. त्यावर जावेद अख्तर यांचे वकील ऍड भारद्वाज यांनी आक्षेप नोंदवला होता. त्यावर जर कंगना पुढील तारखेस कोर्टात हजर राहिली नाही तर आम्ही अटक वॉरंट काढू असे स्पष्ट शब्दात कोर्टाने सुनावले आणि सुनावणी २० सप्टेंबरपर्यंत तहकूब केली. यामुळे आज कंगना कोर्टात हजर झाली नाही तर तिच्याविरोधात अटक वॉरंट काढले जाण्याची शक्यता आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

'अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिपब्लिक टीव्हीवर मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांनी घेतलेल्या मुलाखतीत कंगनाने आपल्याविरोधात बिनबुडाचे आरोप करून नाहक बदनामी केली', अशी तक्रार गीतकार जावेद अख्तर यांनी वकिल जय भारद्वाज यांच्यामार्फत केली. याविषयी पोलिसांच्या अहवालाची दखल घेऊन न्यायालयाने कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. मात्र, वारंवार नोटीस देऊनही कंगना न्यायालयात हजर राहिली नाही. त्यामुळे महानगर न्यायदंडाधिकारी आर. आर. खान यांनी कंगनाला अखेरची संधी देत पुढील सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देश मागील सुनावणीत दिले होते. शिवाय कंगना पुन्हा गैरहजर राहिल्यास तिच्याविरोधात वॉरंट जारी करण्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुभा अख्तर यांना दिली होती.

हेही वाचा : Breaking : कुणी कितीही आरोप केले तरी महाराष्ट्र सरकार झुकणार नाही - संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.