ETV Bharat / sitara

लॉक अप: करणवीरने तिचा 'तो' असा उल्लेख केल्याने सायशा शिंदे नाराज - पाहा व्हिडिओ - सायशा शिंदे जेलमध्ये नाराज

सुप्रसिद्ध ट्रान्सवुमन फॅशन डिझायनर सायशा शिंदे लॉक शोमध्ये निराश होऊन रडताना दिसली. तिला 'ती' म्हणण्याऐवजी 'तो' असे म्हणणाऱ्या करणवीर बोहरावर ती नाराज झाली. त्यानंतर इतर स्पर्धकही सायशाच्या मदतीस आले पण त्यांच्यातही वाद रंगलेला दिसला.

सायशा शिंदे लॉक शोमध्ये निराश
सायशा शिंदे लॉक शोमध्ये निराश
author img

By

Published : Mar 23, 2022, 5:25 PM IST

मुंबई - सायशा शिंदे ही एक सुप्रसिद्ध ट्रान्सवुमन फॅशन डिझायनर आहे आणि सध्या ती कंगना रणौतच्या लॉक अपमध्ये कैदी म्हणून दिसत आहे. तिला अनेकदा ट्रान्सवुमन म्हणून प्रसिद्धी मिळताना दिसत आहे आणि अलीकडे करणवीर बोहराने सायशाला 'तो' म्हणून संबोधले तेव्हा ती पुन्हा नाराज झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

सायशाला सकाळी स्मोकिंग करायचं होतं, पण यार्डमधील कामामुळे तिला स्मोकिंग रूममध्ये जाता आलं नाही, म्हणून ती कॅमेऱ्यासमोर जाऊन रडायला लागली. तिने शोच्या निर्मात्यांवर आरोप केला: "तुम्ही आमच्याशी असे करू शकत नाही!" त्यानंतर करणवीर तिथे येतो आणि तिला असे न वागण्याची सूचना देतो, परंतु संपूर्ण संभाषणात करणवीर सायशाला 'तो' म्हणून संबोधतो. त्याचे असे बोलणे सायशाला आक्षेपार्ह वाटते कारण ती 'तो' नाही 'ती' आहे.

"सर्वप्रथम, तो नाही, ती आहे!" सायशा करणवीरला म्हणते. सायशाची मैत्रिण निशा रावल तिच्या मदतीला येते आणि सगळ्यांना सायशाचा उल्लेख 'ती' म्हणून करायला सांगते. याबद्दल बोलताना सायशाला भावनिक झाला. वाद चिघळू न देण्याचा निशाचा प्रयत्न पाहून मुनावर फारुकी चिडला आणि म्हणाला की जे काही बोलायचे ते थोडक्यात बोल. यावर निशाही मुनावरवर भडकली. ती म्हणाली, की : "काय करावं हे तू मला सांगू शकत नाहीस! हा खरोखरच संवेदनशील विषय आहे."

कंगना राणौत होस्ट करत असलेल्या लॉक अप शोचे 27 फेब्रुवारीपासून ALTBalaji & MX Player वर लाइव्ह स्ट्रिमिंग सुरू झैाले आहे. या शोमध्ये पूनम पांडे, पहल रोहतगी, सारा खान, मुनावर फारुकी, अली मर्चंट, करणवीर बोहरा, निशा रावल आणि इतर "वादग्रस्त सेलिब्रिटी स्पर्धक" कलाकार आहेत. अभिनेत्री-मॉडेल मंदाना करीमी आणि अजमा फल्लाह यांनी वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून शोमध्ये प्रवेश केला आहे.

हेही वाचा - बोल्ड अँड ब्यूटी कंगना रणौतचे लक्षवेधक फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.