ETV Bharat / sitara

'लक्ष्मी' चित्रपटाचे तृतीयपंथीयांसाठी दिल्लीत स्पेशल स्क्रिनिंग; लक्ष्मी नारायण त्रिपाठींची उपस्थिती - 'Lakshmi' movie latest news

बहुचर्चित हॉरर कॉमेडी कॅटेगरीतील 'लक्ष्मी' हा चित्रपट येत्या ९ नव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक राघव लॉरेन्स यापासून बॉलिवूडमध्ये आपली एन्ट्री केली आहे. अक्षय कुमारची मुख्य भूमीका असलेल्या या चित्रपटाचे तृतीयपंथीयांसाठी स्पेशल स्क्रिनिंग आयोजित केले होते.

laxmi narayan tripathi
लक्ष्मी नारायण त्रिपाठी
author img

By

Published : Nov 8, 2020, 5:21 PM IST

नवी दिल्ली - अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा 'लक्ष्मी' हा भयपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. शनिवारी दोघांनी मिळून तृतीयपंथीयांसाठी या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित केले होते. यावेळी चित्रपटाचे निर्माते तुषार कपूर आणि सबीना खान हे देखील उपस्थित होते. दिल्लीतील असफ अलीमार्गावरील 'डिलाईट सिनेमा' या चित्रपटगृहात हा विशेष कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्यासह १५० तृतीयपंथी उपस्थित होते.

'लक्ष्मी' या भयपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. एका तृतीयपंथी व्यक्तीचा आत्मा अंगात घुसलेल्या व्यक्तीची भूमीका अक्षय करत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अतिशय संवेदनशील विषयाला हात घातल्याबद्दल लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी चित्रपटातील कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शकांचे आभार मानले आहेत. चित्रपटाचा ट्रेलरही पाहिला होता आणि आता चित्रपटही पाहिला. यामध्ये कुठेही तृतीयपंथी समाजाच्या भावना दुखावण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे मी या चित्रपटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, असे त्रिपाठी म्हणाल्या.

या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमारने महिलेची वेशभूषाकरून 'बमभोले' या गीतावर धमाकेदार नृत्य केले आहे. भरतनाट्यम् नृत्यांगणाम्हणून प्रसिद्ध असेलेल्या लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी अक्षय कुमारचे जोशपूर्ण नृत्यासाठी कौतुक केले आहे.

यापूर्वी हा चित्रपट यावर्षी मे महिन्यात प्रदर्शित होणार होता, परंतु कोरोना आणि लॉकडाऊनमुळे 'लक्ष्मी'ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. उद्या (९ नोव्हेंबर) हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. दक्षिणात्य अभिनेता राघव लॉरेन्स दिग्दर्शित 'लक्ष्मी' हा हिंदी भाषेतील हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. फॉक्स स्टार स्टुडिओ आणि केप ऑफ गुड फिल्म्सच्या बॅनरखाली हा चित्रपट तयार झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.