मुंबईः आमिर खान आणि करिना कपूर खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या आगामी 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटाच्या निर्मात्यांनी आमिर खानचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. यात आमिर खान सरदारच्या गेटअपमध्ये दिसत आहे.
पोस्टरमध्ये आमिरखान ट्रेनच्या बर्थवर बसलेला दिसत आहे. तो अतिशय साध्या वेशभूषेत दिसत आहे. एका सामान्य सरदारची व्यक्तीरेखा साकारत असल्याचे फर्स्ट लूकवरून लक्षात येतो.
-
All set for #Christmas2020 release... First look poster of #LaalSinghChaddha... Stars Aamir Khan and Kareena Kapoor Khan... Inspired by the classic #ForrestGump... Directed by Advait Chandan. pic.twitter.com/fVLwjMbBRL
— taran adarsh (@taran_adarsh) November 18, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">All set for #Christmas2020 release... First look poster of #LaalSinghChaddha... Stars Aamir Khan and Kareena Kapoor Khan... Inspired by the classic #ForrestGump... Directed by Advait Chandan. pic.twitter.com/fVLwjMbBRL
— taran adarsh (@taran_adarsh) November 18, 2019All set for #Christmas2020 release... First look poster of #LaalSinghChaddha... Stars Aamir Khan and Kareena Kapoor Khan... Inspired by the classic #ForrestGump... Directed by Advait Chandan. pic.twitter.com/fVLwjMbBRL
— taran adarsh (@taran_adarsh) November 18, 2019
आमिरने व्यक्तीरेखा लक्षात घेऊन लांब दाढी ठेवली असून मिशाही मोठ्या ठेवल्या आहेत. डोक्यावर पंजाबी पगडी दिसत आहे. त्याच्या डोळ्यामध्ये एक चमक दिसत आहे.
सिने ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी हे पोस्टर ट्विटरवर शेअर केले असून. अद्वैत चंदन यांचे दिग्दर्शन असलेला 'लाल सिंह चड्ढा' हा चित्रपट २०२० च्या ख्रिसमसमध्ये रिलीज होणार असल्याचे लिहिले आहे.