मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान आपल्या आगामी 'लालसिंग चड्ढा' चित्रपटाचे शेवटचे शूटिंग शेड्यूल लडाखमध्ये करणार आहे. युध्दाचा प्रसंग शूट करण्यात येणार असून यामध्ये तेलुगु अभिनेता नागा चैतन्य सहभागी होणार आहे.
लालसिंग चड्ढा चित्रपटाची टीम बर्फ वितळण्याची वाट पहात होती जेणेकरून ते पुढे जाऊन मे आणि जूनमध्ये कारगिल युद्धाचा प्रसंग शूट करू शकतील. चित्रपटाच्या संकल्पनेतला हा क्रम खूप महत्त्वाचा आहे. म्हणूनच अमीरने या भव्य युध्दाच्या सीक्वेन्ससाठी अॅक्शन डायरेक्टर परवेझ शेख यांना आमंत्रीत केले आहे. परवेझने यापूर्वी हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या भूमिका असलेल्या वॉर चित्रपटासाठी अॅक्शन सीक्वेन्स दिग्दर्शित केले होते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
६ मे रोजी, आमिर, परवेझ आणि त्याच्या टीममधील काहीजण रेकीसाठी लडाखला रवाना झाले होते. युध्दाचे शूटिंग कुठे करायचे हे ठरल्यानंतर ते गेल्या आठवड्यात ते मुंबईला परतले. हा चित्रपट १९९४ मध्ये आलेल्या हॉलिवूड हिट फिल्म 'फॉरेस्ट गंप'चा अधिकृत रीमेक असून यात टॉम हॅन्क्सने मुख्य भूमिका केली होती. मूळ चित्रपटात बेंजामिन बुफोर्ड ब्लू उर्फ बुब्बाची भूमिका करण्यासाठी नाग चैतन्यची निवड करण्यात आली आहे. तो सिनेमाच्या शेवटच्या शेड्यूलमध्ये सहभागी होण्यासाठी लडाखमध्ये येणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
या चित्रपटात मुख्य भूमिका करण्याबरोबरच आमिरने या चित्रपटाची निर्मिती केली असून यात करिना कपूर खान देखील आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित 'लालसिंग चड्ढा' यावर्षी ख्रिसमसच्या आसपास रिलीज होणार आहे. तथापि, आगामी वेळापत्रक आणि देशातील कोविड परिस्थितीनुसार हे रिलीज पुढे ढकलले जाऊ शकते.
हेही वाचा - लस महोत्सव' साजरा केला, मात्र लसीची व्यवस्था नाही'; प्रियंका गांधींचा मोदींवर घणाघात