मुंबई - बॉलिवूड अभिनेता कुणाल केम्मू आपल्या लाडक्या लेकीच्या प्रेमात आहे. याचा एक नमुना सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. कुणालने आपल्या मुलाच्या नावाचा टॅटू गोंदला आहे.
कुणाल केम्मूने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केलाय. यात त्याने लेकीचे नाव गोंदलेले स्पष्ट दिसत आहे. फोटोमध्ये देवनागरी लिपीमध्ये लेकीचे नाव 'इनाया' दिसत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
कुणालने आपल्या फोटोला कॅप्शन देताना लिहिले आहे, ''ही शाई भावनात्मकदृष्ट्या माझ्या मनाच्या खूप जवळ आहे. माझी लहान मुलगी आहे, जी नेहमी माझा एक भाग राहील.''
तो म्हणाला, ''तिचे देवनागरी लिपीतील इनाया हे नाव केंद्रस्थानी आहे आणि नौमीचा अर्थ दुर्गा आहे जे लाल बिंदी आणि दोन त्रिशूलाचे प्रतिनिधीत्व करते.''