मुंबई - बॉलिवूडमध्ये एकीकडे काही कलाकार आपल्या लिंकअपच्या चर्चामुळे प्रसिद्धीच्या झोतात आहेत. तर, दुसरीकडे मात्र काही कलाकार आपले मार्ग वेगळे करत आहेत. मागच्या वर्षी अभिनेत्री दिया मिर्झाने तिच्या पतीला घटस्फोट देत असल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली होती. तर, आता आणखी एक जोडी एकमेकांना घटस्फोट देणार असल्याचे समोर आले आहे.
आपल्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकणारी ही जोडी म्हणजे अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा आणि अभिनेता रणवीर शौरी हे आहेत. दोघेही एकमेकांपासून ३ वर्षांपासून वेगळे राहत होते. मात्र, आता त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -'पिया तोसे नैना लागे', पाहा जान्हवी कपूरचा डान्स व्हिडिओ
मीडिया रिपोर्टनुसार, दोघांनीही न्यायालयीन प्रक्रियेने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनी घटस्फोटाचा अर्ज देण्यापूर्वी काउंसलिंगची मदतही घेतली होती. मात्र, तरीही त्यांच्यातील मतभेद दूर झाले नाही.
हेही वाचा -'कमल हासनने तामिळ अभिनेत्री रेखाची माफी मागावी', नेटकऱ्यांची मागणी
रणवीर शौरीने २०१४ साली 'तितली' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कोंकणापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचे लग्न २०१० साली पार पडले होते. अवघ्या ५ वर्षांमध्येच त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. त्यांना ६ वर्षाचा एक मुलगा देखील आहे. त्याचे नाव हारुन असे आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">