ETV Bharat / sitara

'KGF: Chapter 2': नव्या पोस्टरवर 'यश'चा करारी लूक, रिलीजची प्रतीक्षा सुरू - ‘केजीएफ: चॅप्टर 2चे नवे पोस्टर

सुपरस्टार यश याच्या ‘केजीएफ: चॅप्टर 2’ चित्रपटाची उत्सुकता खूपच ताणली आहे. रिलीजच्या तारखेची प्रतीक्षा करीत असलेल्या चाहत्यांसाठी खूशखबर आहे. या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज झाले असून लवकरच रिलीज तारीखही जाहीर होणार आहे.

'KGF: Chapter 2'
'KGF: Chapter 2'
author img

By

Published : Jul 8, 2021, 7:34 PM IST

कन्नड अभिनेता यश याच्या ‘केजीएफ: चॅप्टर 2’ या चित्रपटाच्या रिलीजची चाहत उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज झाले असून यातयात सुपरस्टार यशचा करारी लूक दिसत आहे.

भव्य पोशाखात परिधान केलेला, यश या पोस्टरमध्ये वाढलेल्या दाढीसह कणखर दिसत आहे. त्याचे आसनही दिमाखदार असून भडकलेली ज्वाला पोस्टरवर दिसत आहे. केजीएफच्या सिक्वेलबद्दलची उत्सुकता वाढवणारे हे पोस्टर आहे.

यापूर्वी संजय दत्तने आपल्या इंस्टाग्राम हँडलवरही सिनेमाच्या रिलीजच्या तारखेतील बदलाविषयी अपडेट शेअर केले होते. "हॉल जेव्हा गँगस्टर्सने भरुन जाईल तेव्हाच राक्षसांचे आगामन होईल. त्याच्या आगमनाची नवी तारीख लवकरच कळेल'', असे संजय दत्तने लिहिले होते.

सुपरस्टर यशशिवाय, या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि रवीना टंडन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट हिंदी, मल्याळम, तामिळ आणि तेलगू भाषांमध्येही डब केला जाईल.

‘केजीएफ: अध्याय 2’ 16 जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल होणार होता. परंतु कोरोना साथीमुळे परिणामी लॉकडाऊनमुळे रिलीजची तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे. निर्मात्यांनी अद्याप चित्रपटाच्या नवीन रिलीज तारखेची घोषणा केलेली नाही.

हेही वाचा - 'रामसे ब्रदर्स'मधील आणखी एक तारा निखळला, कुमार रामसेंचे निधन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.