ETV Bharat / sitara

कॅटरिना विकी चॉपरने हनीमुनसाठी विमानतळाकडे रवाना - विकी कॅटरिनाचा विवाह

कॅटरिना कैफ आणि विकी कौशल जयपूरला पोहोचले आहेत. सकाळी नऊच्या सुमारास नवविवाहित जोडपे शेरपूर हेलिपॅडवर पोहोचले. दोघेही हेलिकॉप्टरने जयपूरला रवाना झाले. यावेळी कॅटरिना पीच कलरच्या पेअरमध्ये दिसली.

कॅटरिना कैफ आणि विकी कौशल
कॅटरिना कैफ आणि विकी कौशल
author img

By

Published : Dec 10, 2021, 6:18 PM IST

सवाई माधोपूर - चौथ का बरवरा (Chauth Ka Barwara) येथील सिक्स सेन्सेस फोर्ट हॉटेलमध्ये (Six Senses Fort Hotel) लग्नानंतर चित्रपट कलाकार कॅटरिना कैफ आणि विकी कौशल (vicky kaushal and katrina kaif) शेरपूर हेलिपॅडवर पोहोचले. त्यानंतर हे जोडपे हनीमुनसाठी हेलिकॉप्टरने जयपूरला रवाना झाले. दरम्यान, शाही लग्नात सहभागी झालेल्या पाहुण्यांची परतण्याची तयारी सुरू झाली आहे.

कॅटरिना कैफ आणि विकी कौशल जयपूरला पोहोचले

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे जोडपे कुटुंबातील तीन सदस्यांसह दुहेरी इंजिन असलेल्या हेलिकॉप्टरने जयपूर विमानतळाकडे रवाना झाले. लग्नापूर्वी कॅटरिना कैफ आणि विकी कौशल जयपूर विमानतळावरच आले होते. तेथून पुढे ते सवाई माधोपूरला वाहनातून रवाना झाले होते.

कॅटरिना कैफ आणि विकी कौशल
कॅटरिना कैफ आणि विकी कौशल

दोघांचे लग्न गुरुवारी (9 डिसेंबर 2021) हिंदू रितीरिवाजांनुसार पार पडले. या लग्नात बॉलिवूडचे प्रसिद्ध सेलिब्रिटी सामील झाले होते. आता कॅटरिना-विकी हनीमूनला जात आहेत, मात्र कामामुळे दोघेही लवकरच परतणार आहेत.

फोटो शेअर करुन नवविवाहितांनी मागितला आशीर्वाद

गुरुवारी लग्नानंतर कॅटरिनाने तिचे फोटोही इंस्टाग्रामवर शेअर केले. या फोटोंना कॅप्शन देताना कॅटरिनाने लिहिले की, "आमच्या हृदयातील एकमेकांबद्दलचे प्रेम आणि आदर आज आम्हाला इथे घेऊन आला आहे. आमच्या नवीन आयुष्यासाठी आम्हाला तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे."

कॅटरिना कैफ आणि विकी कौशल
कॅटरिना कैफ आणि विकी कौशल

शाही विवाहाच्या सर्व कार्यक्रमांची जोरदार चर्चा झाली. या भव्य लग्नाची प्रत्येक बातमी गुपचूप जाणून घ्यायची प्रत्येकाला इच्छा होती. बरवाडा किल्ल्यावरील लग्न मंडप काच आणि सुगंधी फुलांनी सजवण्यात आला होता.

कॅटरिना कैफ आणि विकी कौशल
कॅटरिना कैफ आणि विकी कौशल

गुरुवारी सकाळी दिल्लीहून फुले मागवण्यात आली. लग्नानंतर विकी-कॅटरिनाने गडाबाहेर आपल्या चाहत्यांना मिठाई आणि केक पाठवले. बाहेर उपस्थित ग्रामस्थांनीही या जोडप्याला लग्नासाठी शुभेच्छा दिल्या.

कॅटरिना कैफ आणि विकी कौशल
कॅटरिना कैफ आणि विकी कौशल

हेही वाचा - सलमानच्या कुटुंबातून आली कॅटरिना विकीच्या लग्नाबद्दलची प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.