मुंबई - अभिनेता हर्षवर्धन कपूरने अलिकडेच एका टीव्ही कार्यक्रमात चाहत्यांशी बोलताना कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या रिलेशनबाबतचा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर सर्वच माध्यमांनी बातम्या केल्या आणि या प्रेम प्रकरणाची चर्चा केली. यानंतर विकीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसली तरी कॅटरिना कैफ मात्र नाराज असल्याचे समजते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
''सध्या सुरू असलेल्या अफवांपैकी कोणत्या जोडीचे प्रेम प्रकरण अफवा नसून खरे आहे?", असा प्रश्न हर्षवर्धनाला चॅट शोमध्ये विचारण्यात आला होता. याचे उत्तर देताना तो म्हणाला, "विक्की आणि कॅटरिना एकत्र आहेत, हे खर आहे." पण लगेचच तो म्हणाला, "यासाठी मी त्यांना अडचणीत तर आणत नाही ना?"
नेमके हर्षवर्धन म्हणाला तसेच घडलंय. त्याच्या या विधानामुळे कॅटरिना कैफची अडचण वाढली आहे. रिपोर्टनुसार कॅटरिनाने थेट प्रसिध्दी माध्यामांकडे प्रतिक्रिया दिलेली नसली तरी तिच्या जवळच्या सूत्राने सांगितले आहे की ती नाराज झाली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
''त्याने (हर्षवर्धन कपूर) लव्ह लाईफबद्दल चॅट शोमध्ये बोलण्याचा संबंधच नाही. ती त्याला फारशी ओळखतही नाही. आणि जरी ती त्याला चांगल्याप्रकारे ओळखत असती तरीही त्याने तिच्या खासगी आयुष्याबद्दल सार्वजिक बोलण्यापूर्वी तिच्याशी चर्चा केली पाहिजे.'' असे सूत्राने सांगितले.
सूत्राचे म्हणणे होते की कॅटरिना तिच्या सध्याच्या नात्याबद्दल खूपच सावध आहे. "तिच्या पूर्वीच्या संबंधात (रणबीर कपूरसोबत) ती खूप वाईट दुखावली गेली आहे. तिला (तिचे सध्याचे नाते) शक्य तितक्या शांत ठेवण्याची इच्छा आहे," असे वेबलोडशी बोलताना कॅटरिनाच्या जवळच्या सूत्राने सांगितले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
विकी आणि कॅटरिना बर्याच काळापासून डेट करीत असल्याची चर्चा आहे. मात्र दोघांनीही हे नाते गुलदस्त्यात ठेवणेच पसंत केले आहे.
हेही वाचा - विक्की आणि कॅटरिना 'रिलेशनशिप'मध्ये, हर्षवर्धन कपूरने केला गौप्यस्फोट