मुंबई - २०२०मध्ये अनेक बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यामुळे फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक आश्चर्यकारक गोष्टी घडताना पाहायला मिळतील. यापैकीच एक गोष्ट म्हणजे अभिनेत्री कॅटरिना कैफ आगामी चित्रपटात नवोदित कलाकार इशान खट्टर आणि सिध्दांत चतुर्वेदीसोबत स्क्रिन स्पेस शेअर करताना दिसेल. 'फोन बुथ' असे शीर्षक असलेल्या या चित्रपटाची कथा हॉरर कॉमेडीची आहे.
अद्याप या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र सिद्धांत याची निवड दोघांसोबत झाली असल्याचे समजते. हा चित्रपट रितेश सिध्दवाणी आणि फरहान अख्तर यांच्या संयुक्त प्रॉडक्शनच्या वतीने बनवला जाणार आहे.
हेही वाचा- विजय देवेराकोंडाने करण जोहरला दिले 'संस्मरणीय' चित्रपटाचे वचन
या चित्रपटात काम करण्यासाठी इशान खट्टर उत्साही असल्याचे समजते. त्याने कथा वाचल्यानंतर खूप आवडल्याचे म्हटले आहे. या चित्रपटाबद्दल अधिक न बोलता शूटिंग सुरू होईपर्यंत थांबा, असे त्याने सांगितलंय.
'फोन बुथ' हा चित्रपट गुरुमित सिंग दिग्दर्शित करणार आहे.